Sadhus Beaten In Sangli : मारहाण झालेल्या साधूंच्या जबाबासाठी सांगली पोलिस उत्तर प्रदेशात पोहोचले
Sadhus Beaten In Sangli : जत तालुक्यातील लवंगा गावी मारहाण झालेले ते 4 साधू उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या मागोमाग सांगली पोलिसही साधूंचे जबाब घेण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत.
Sadhus Beaten In Sangli : जत तालुक्यातील लवंगा गावी मारहाण झालेले ते 4 साधू उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या मागोमाग सांगली पोलिसही साधूंचे जबाब घेण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. उमदी पोलीस ठाण्याचे एक पथक साधूंचे जबाब घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलं आहे.
सुमोटो पोलिसांनी तक्रार दाखल केल्याने पुन्हा साधूंचे जबाब पोलिसांना घ्यावे लागणार आहेत. या मारहाण प्रकरणात आज आणखी 5 जणांना पोलिसांनी केली अटक केली आहे. पोलिसांनी 25 जणांवर गुन्हे दाखल करत सात जणांना अटक केली होती. त्यांना काल न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. आमसिद्ध तुकाराम सरगर, लहू रकमी लोखंडे, नागराज पवार, सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बगौडा बिराजदार व शिवाजी सिद्धराम सरगर यांना सशर्त जामीन मंजूर केला.
नेमकं प्रकरण काय?
नेमचंद गोसावी, राजू गोसावी, पप्पू गोसावी व प्रेमशंकर हे चार साधू चारचाकीतून विजापूरहून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. देवदर्शनासाठी निघालेल्या साधूनी लवंगा येथे पंढरपूरचा रस्ता विचारला होता. मात्र, गावातील सरपंच पुत्रासह जमावाने मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून चारही साधूना अमानुषपणे मारहाण केली होती. ग्रामस्थांना ही मुले पळवून नेणारी टोळी आहे असा संशय घेत गाडी अडवली व त्यांना गाडीतून खाली खेचून पट्ट्याने लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर या चौघा साधूंना पोलिस येईपर्यंत बंदिस्त करून ठेवले.
उमदी पोलिसांनी चौघा साधूंवर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. त्या साधूंनी आमची काहीच तक्रार नसल्याचे सांगत साधू पुढच्या प्रवासाला निघाले. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अटक करण्यास सुरवात केली.
इतर महत्वाच्या बातम्या