एक्स्प्लोर

Sangli News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा उद्रेक; समाजाचा शेळ्या, मेंढ्यांसह मोर्चा काढत निर्वाणीचा इशारा

Dhangar reservation : मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजदेखील आरक्षण मिळेपर्यंत गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करणार, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. 

तासगाव (जि. सांगली) : राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण मिळालं नसल्यास धनगर समाजाचा (Dhangar Reservation) उद्रेक होईल, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा समस्त धनगर समाजाच्या वतीने सांगलीमध्ये (Sangli News) देण्यात आला. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये धनगर समाजाचा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील भिलवडी नाक्यापासून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पारंपारिक वाद्य, शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले. 

मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणालाही खासदार-आमदारांनी आणि नेत्यांनी पाठिंबा द्यावा व आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घ्यावी, तसेच मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजदेखील आरक्षण मिळेपर्यंत गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करणार, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.  मुदतीत आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी सांगली जिल्हा धनगर महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला.

सांगलीत सर्व आमदार, खासदारांचे लाक्षणिक उपोषण 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पुढील निवडणुकीत निश्चित फटका बसेल, असा इशारा सकल मराठा समाजाकडून सांगलीत देण्यात आला. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते. याचवेळी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेत आरक्षणाच्या मुद्यावर कोंडीत पकडले. सकल मराठा समाजाकडून लोकप्रतिनिधींची भेट घेऊन भूमिका जाणून घेण्यात आली. यावेळी सर्वांनीच मराठा आरक्षणासाठी आता केवळ आश्वासन न देता त्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी येत्या चार दिवसांचा इशारा देऊन जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सर्वांनीच राजीनाम्याचा विषय टाळला. यावेळी सकल मराठा समाजाचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, अशोक पाटील, शंभोराज काटकर आदींनी यावेळी आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांकडून मुख्यमंत्र्यांना एकदिवसीय अधिवेशन घेण्याबाबत पत्र तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण आज करण्यात येत आहे.  

मनोज जरांगेंबाबतचं 'हेच' वक्तव्य आमदार प्रकाश सोळंकेंना भोवलं

दुसरीकडे, सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. यावेळी प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधार्थ आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक केली. बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Embed widget