एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगलीमधील माय लेकीच्या हत्याकांडाचा उलगडा; करणी केल्याच्या संशयातून चुलत दिरांकडून निर्घृण हत्या

प्रियांका बेंळूखे (वय 32) आणि  मोहिनी बेंळूखे (वय 14) या मायलेकींचा गळा आवळून खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी पतीने खून केल्याच्या संशयातून आणि तक्रारीनंतर पती बिराप्पा बेंळूखेला अटक केली होती.

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाच दिवसांपूर्वी उमदीजवळ कुणीकोनूरमध्ये झालेल्या मायलेकींच्या हत्येमध्ये धक्कादायक उलगडा झाला आहे. करणी केल्याच्या संशयातून तिघा दिरांनी मिळून मायलेकींची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. उमदी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अजून एकजण फरार आहे. 

पाच दिवसांपूर्वी, प्रियांका बेंळूखे (वय 32) आणि  मोहिनी बेंळूखे (वय 14) या मायलेकींचा 24 एप्रिल रोजी गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी पतीने खून केल्याच्या संशयातून आणि तक्रारीनंतर पती बिराप्पा बेंळूखेला अटक केली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये चुलत दिरांकडून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विकास मारुती बेळुंखे आणि अक्षय रामदास बेळुंखे अशी संशयितांची नावे आहेत.  

दरम्यान, मयत प्रियांकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना तपास करत असतानाच बेंळूखे भावकीमधील तिघांवर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित विकास व अक्षयवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता करणीच्या संशयातून मायलेकींचा खून केल्याची कबूली दिली. रविवारी पाणी पिण्याच्या बहाण्याने मयत प्रियांकाच्या घरी आरोपी विकास व अक्षय गेले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी त्यांचा अन्य एक मित्रही होता. प्रियाकाचा विकासने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आईची ओरड सुरू झाल्याने मुलगी मोहिनी आईकडे धावल्यानंतर तिचाही आरोपींनी गळा दाबून खून केला. यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून अक्षय हा अंत्यविधी करतानाही हजर होता. काही घडले नसल्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर खुनाची कबूली दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
Kolhapur News : तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange : मनोज जरांगेंनची भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 06 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Full Speech : हाती कोर्टाची ऑर्डर घेत शिंदे म्हणाले, फाशीची सजा दिली! UNCUT भाषणPune MPSC Protest : पुण्यात आंदोलक MPSC विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
Kolhapur News : तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
Mike Lynch : ब्रिटनच्या बिल गेटस यांच्यासह 18 वर्षीय लेकीचा मृतदेह मिळाला, समुद्रात आलिशान याॅट बुडाली
ब्रिटनच्या बिल गेटस यांच्यासह 18 वर्षीय लेकीचा मृतदेह मिळाला, समुद्रात आलिशान याॅट बुडाली
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 
CM Eknath Shinde In Kolhapur : बदलापुरात आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं; लोकांना वेटीस धरलं, हे कुठलं आंदोलन? सीएम शिंदेंची विचारणा
बदलापुरात आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं; लोकांना वेटीस धरलं, हे कुठलं आंदोलन? सीएम शिंदेंची विचारणा
Video : राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
Video : राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
Embed widget