एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगली जिल्ह्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड, जत तालुक्यात माय लेकीचा गळा आवळून खून

माय लेकीची कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उमदी पोलीसांनी हत्येचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी पती बिरप्पाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधील कुणीकुणुर गावामध्ये मायलेकीचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला आहे. प्रियंका बेळूखे (वय 32 वर्षे) आणि त्यांची मुलगी मोहिनी बेळूखे (वय 14 वर्षे) असे मृत मायलेकीचे नाव आहे. मायलेकीची कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उमदी पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी पती बिरप्पाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहेत.

अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार करत आहेत. घटनास्थळी आज (24 एप्रिल) सकाळी प्रियांका आणि मोहिनीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर उमदी पोलिसांनी तातडीने दाखल होऊन पंचनामा करुन तपास सुरु केला आहे. मायलेकीचा कापडाने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात खुनाच्या सलग घटना घडल्या आहेत. सांगलीत महिनाभरात पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड घडले आहे. गेल्या महिन्यात सांगलीमधील कोसारीत दुहेरी हत्याकांड घडले होते. जत तालुक्यामध्येच माजी भाजप नगरसेवकाची सुद्धा निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

भर रस्त्यात पाठलाग करुन सराईत गुन्हेगाराची हत्या

दरम्यान, आठवडाभरापूर्वी भर रस्त्यात पाठलाग करुन खून करण्याची घटना कुपवाडजवळच्या बामणोलीत घडली होती. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असं मृत गुन्हेगाराचं नाव आहे. मृत अमर जाधव हा आपल्या दुचाकीवरुन कुपवाडनजीक असणाऱ्या बामणोली येथील आपल्या घरी निघाला होता. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. तत्पूर्वी, 13 एप्रिल रोजी सांगली शहरामध्येच सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केला. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. राजवर्धन राम पाटील (वय 18 वर्षे) असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. याच घटनेपूर्वी, वानलेसवाडी येथे एक गुंठ्यांच्या जागेवरुन महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Embed widget