Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
उत्तम मोहिते यांच्यावर अचानक हल्ला करण्यासाठी आठ ते नऊ हल्लेखोर आले होते. या हल्ल्यात भांडणे सोडविण्यास गेलेला उत्तम मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय 21) हा जखमी झाला आहे.

Sangli Crime: सांगलीत दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिनीच स्टेजवर शुभेच्छा स्वीकारत असताना निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात हल्लेखोर शाहरुख शेख सुद्धा गंभीर जखमी झाल्याने जागीर ठार झाला. ही घटना सांगली शहरातील गारपीर चौकात ( काल रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असल्याने याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेला होता. उत्तम मोहिते यांच्यावर गुप्तीन सपासप वार करून खून करण्यात आला. 'मुळशी पॅटर्न' सिनेमा स्टाईलप्रमाणे (Mulshi Pattern Style Murder Sangli) ही हत्या करण्यात आली. उत्तम मोहिते यांच्यावर अचानक हल्ला करण्यासाठी आठ ते नऊ हल्लेखोर आले होते. या हल्ल्यात भांडणे सोडविण्यास गेलेला उत्तम मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय 21) हा जखमी झाला आहे.
हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? (Garpir Chowk Murder Sangli)
उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्यांपैकी शाहरुख उर्फ शब्या शेखचा देखील या घटनेत मृत्यू झाला. वार करणाऱ्या शाहरुख शेखचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. हल्ल्यावेळी शाहरुख शेखच्या पायाला एक वार लागला, ज्यामुळे रक्तस्राव सुरू झाला आणि या घटनेमध्ये त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच वेळी दोघांची हत्या झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. चाकु, धारदार हत्यार, रॉड, काठीने उत्तम मोहिते यांची हत्या त्यांच्या राहत्या घरीच करण्यात आली. दुसरा मयत शाहरुख शेखचा मृत्यू हा उत्तम यांच्यावर हल्ला करत असताना शाहरुखच्या पायाला चाकू लागून नस कापली गेल्याने प्रचंड रक्तसाव होऊन शाहरुखचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
मोहिते यांच्या हत्या प्रकरणात 8 आरोपींची नावे समोर (Sangli Double Murder)
या दोन खुनांमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस दोघांमध्ये काही जुना वाद होता का, या दृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून, परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहर हादरले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मोहिते यांच्या हत्येतील आरोपी समोर आले असून यामध्ये गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, आणि समीर ढोले यांचा समावेश आहे. हे सर्व सांगलीतील इंदिरानगर भागातील आहेत.
नेमका हल्ला कसा झाला? (Sangli Crime News)
उत्तम यांच्यावर आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठी घेवून घरात शिरून पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी करून खुन केला. त्यांची भांडणे सोडविण्यास फिर्यादीचा पुतण्या योसेफ सतीश मध्ये गेला असता त्यालाही जिवंत ठेवत नाही असे म्हणत त्याच्या छातीवर गणेश मोरेनं वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या























