एक्स्प्लोर

Sangli crime: बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?

Sangli Murder news: शाहरुख शेख आणि त्याचे साथीदार बर्थडे पार्टीत उत्तम मोहिते यांच्याजवळ गेले अन् गुप्ती पोटात खुपसली. यानंतर एकच गोंधळ उडाला. या डबल मर्डरमुळे सांगली जिल्हा हादरला.

Sangli Murder news: सांगली शहरातील गारपीर चौकात मंगळवारी रात्री दुहेरी हत्याकांड झाले. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सांगलीतील दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव मोहिते (Uttam Mohite) यांची काल त्यांच्याच वाढदिवसाच्या पार्टीत निर्घृणपणे हत्या (Murder news) करण्यात आली. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एका हल्लेखोराचाही या घटनेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सध्या सांगलीत शहरात (Sangli News) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गारपीर चौकाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

उत्तमराव मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने गारपीर चौकात असलेल्या त्यांच्या घरापासून काही अंतरावरच जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मांडव टाकून पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आले होते. शाहरुख शेख उर्फ शब्या हादेखील आपल्या आठ ते दहा साथीदारांसह याठिकाणी आला होता.

हे सर्वजण या कार्यक्रमात आल्यानंतर सगळ्यांनी आधी जेवणावर ताव मारला. त्यानंतर उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण त्यांच्याजवळ जातात या सगळ्यांना त्यांच्याकडील धारदार हत्यारं बाहेर काढली. एका गुप्तीने उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार करण्यात आले. इतरांना उत्तम मोहिते यांच्यावर तलवारीचे वार केले. यावेळी उत्तम मोहिते यांनी जवळच असलेल्या आपल्या घरात धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत घराच्या आत जाऊन त्यांना मारले. काही कळण्यापूर्वीच उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार झाल्याने त्यांचा देह रक्तबंबाळ झाला आणि ते खाली कोसळले. यामुळे उत्तम मोहिते यांचा पुतण्या संतापला आणि त्याने आपल्या काकांवर वार करणाऱ्या शाहरुख शेख याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. हा घाव शाहरुख शेखच्या पायावर बसला आणि प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर उत्तम मोहिते यांचे इतर समर्थकही हल्लेखोरांवर तुटून पडले आणि जमावाने शाहरुख शेखला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हल्ला करणारे तरुण ड्रग्जच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. याच नशेखोरीमुळे सांगलीत गुन्हेगारी वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल हत्या, वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार करुन संपवलं

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget