Sangli Crime: आटपाडीत शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यात पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष; एक कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा
सुरवातीस फिर्यादीस 15 लाख 40 हजार रुपयांचा परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर उर्वरीत मुद्दल रक्कम 62 लाख 18 हजार 900 रुपये व त्यावरील परतावा न देता फसवणूक केली आहे.
Sangli Crime : शेअर मार्केटमध्ये 10 महिन्यांमध्ये दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामजी चंद्रकांत होनमाने (वय 30 रा. मंगलवेढा जि. सोलापूर सध्या रा. आटपाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, आटपाडी येथील निहारिका फायनान्सिअल सर्व्हिसेस प्रा.लि या कंपनीच्या कार्यालयामध्ये 19 मे 2021 ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कंपनीच्या संतोष रामचंद्र अडसूळ, राहुल अशोक अडसूळ, विनायक शंकर माळी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी सुधीर रामचंद्र अडसूळ, निकिता संतोष अडसूळ, अनिल आनंदा अडसूळ, मल्हारी संजय अडसूळ (सर्व रा. आटपाडी) यांनी फिर्यादी रामजी चंद्रकांत होनमाने यांच्याकडून 77 लाख 58 हजार 900 रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. दहा महिन्यात गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
सुरवातीस फिर्यादीस 15 लाख 40 हजार रुपयांचा परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर उर्वरीत मुद्दल रक्कम 62 लाख 18 हजार 900 रुपये व त्यावरील परतावा न देता फसवणूक केली आहे. याचबरोबर संतोष सुभाष गुजले यांची 18 लाख 90 हजार, प्रवीण बाळासो बनसोडे यांची 8,50,670, तर यशवंत हरिदास मेटकरे यांची 5 लाख रुपयांची अशी एकूण 94 लाख 59 हजार 570 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबात अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.
धूम स्टाईलने पळून जाताना चोरट्यांच्या दुचाकीचा अपघात
इतर महत्वाच्या बातम्या