(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sadabhau Khot : आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? सदाभाऊ खोतांचा भाजपला संतप्त सवाल
Sadabhau Khot : आम्ही मोदी आणि फडणवीसांच्याकडे पाहून काम करू, पण घटक पक्ष म्हणून विकास कामांसाठी थोडासा निधी दिला असता तर बरं झालं असतं असं माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.
सांगली: आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुका जवळ आल्यावरच भाजपला मित्रपक्षांची आठवण होते असं म्हणत माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. घटक पक्षाला सन्मान द्या, मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
सांगलीतील महायुतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची खदखद बाहेर आली. ते म्हणाले की, सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि सेना हे मोठे पक्ष आहेत. छोटे घटक बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे. असे करू नका, आम्हालाही सन्मान द्या.
सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही, तो सन्मान द्या. घटक पक्ष आला की हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे.
तुम्ही आम्हाला गुलाम समजू नका
सदाभाऊ खोत म्हणाले की, आम्ही आता मोदी, फडणवीस यांच्याकडे पाहून काम करू. पण तण काढणारा उपाशी राहता कामा नये. कारण त्यांना विचारात घ्या. सन्मान द्या घटक पक्षांची अपेक्षा काय असते. विकास कामासाठी आम्हाला थोडा निधी दिली दिला असता तर बरं झालं असतं. आम्ही लाठ्या, काठ्या खाल्ल्या आहेत. माढामध्ये आम्हाला 5 लाखांच्या वर मतं मिळाली आहेत. तुम्ही आम्हाला गुलाम समजू नका.
ही बातमी वाचा :