Ramdas Athawale on MVA : 12-12 जागांचा प्रस्ताव घेऊन एकत्र या, म्हणजे तुमचे 12 वाजवायला सोपं जाईल; रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला
बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे, त्यांनी त्याचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला. राज्यात वंचितने 12-12 जागांचा प्रस्ताव दिला आहे, हा प्रस्ताव चांगला आहे, त्यामुळे चारही पक्षांनी 12-12 जागा घ्याव्यात, म्हणजे आम्हाला त्यांचे 12 वाजवता येतील, असा टोलाही रामदास आठवलेंनी लगावला. ते सांगलीमध्ये (Sangli News) पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महाराष्ट्रमध्येच गरज असून दिल्लीत फडणवीस यांनी येण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. शिर्डीमधून निवडणूक लढवू इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार निवृत्ती घेतील असे वाटत नाही
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) निवृत्ती घेण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून रामदास आठवले यांनी भाष्य केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही, आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु आहे. प्रकाश आंबडेकर सक्षम नेते आहेत, ते महायुतीसोबत येणार नाहीत, पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत, 12 जागांचा प्रकाश आंबेडकर यांचा मविआला प्रस्ताव आहे, त्या जागा त्यांना द्यावात म्हणजे आम्हला त्याचे बारा वाजवणे सोपे जाईल. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे, त्यांनी त्याचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकार आरक्षण देण्याबाबत पॉझिटिव्ह
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईचा मोर्चा तात्पुरता रद्द करून सरकारला काही वेळ द्यावा, सरकार आरक्षण देण्याबाबत पॉझिटिव्ह आहे. जरांगे पाटील आणि भुजबळ यांनी वाद मिटवला पाहिजे, दोघानी भांडण करून ताकद वाया घालवू नये. मराठा समाजाचा वेगळा वर्ग बनवून तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे हा प्रस्ताव मी सरकारला, मुख्यमंत्री यांना दिला आहे. दोन वर्ग बनवून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देणारा आमचा पहिला पक्ष आहे. 8 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबाला आरक्षण द्यायला हवे. व्हिजिएनटी धून काही समाज वेगळे आरक्षण मागत आहे, यावर मोदी सरकार विचार करत आहे. मराठा समाजाची ओबीसीमधून आरक्षण मागणी होतं आहे, पण ओबीसीला धक्का लागता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
एनडीएमधून आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूकला सामोरे जाऊ आणि 400 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील, इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही. रिपब्लिकन पक्षाला 2 तरी जागा द्याव्यात ही माझी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद मिळावे, त्यासाठी विस्तार करण्याची आमची मागणी आहे. राम मंदिर अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, बाबरी मशीदच्या जागी मंदिर होते. राम मंदिर उद्घाटन सोहळा भाजपचा नाही, ट्रस्टचा हा सोहळा आहे. आदर आहे त्यांनी अयोध्या मध्ये दर्शनासाठी जावे. निमंत्रण येण्याची शक्यता आहे, तेव्हा जाऊ, मी सर्वधर्म मानणारा असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या