Nilesh Rane : हिंदूंच्या सणांसाठी गेल्या अडीच वर्षात शहाजी बापूंसारख्या योद्ध्यांनी राज्यातून कोरोना घालवला
बापूंना आता लवकरच कोकणात देखील यावं लागेल. तिकडे पण डोंगर, झाडी आहे, ती आम्ही दाखवू असे म्हणत निलेश राणे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे कौतुक करत त्यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले.
Nilesh Rane : शाहरुख खान एवढी शहाजी बापूंची महाराष्ट्रात क्रेझ तयार झाली आहे. बापूंना आता लवकरच कोकणात देखील यावं लागेल. तिकडे पण डोंगर, झाडी आहे, ती आम्ही दाखवू असे म्हणत निलेश राणे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे कौतुक करत त्यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले.
दुसरीकडे अडीच वर्षांनी हिंदू धर्माच्या सणासाठी शहाजी बापू सारख्या योद्धानी महाराष्ट्रमधून कोरोना घालवला असे म्हणत उद्धव ठाकरे यांना निलेश राणे यांनी टोला देखील लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता सगळे सण निर्बधमुक्त होत आहेत असेही राणे म्हणाले. सांगलीच्या पलूस येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी देखील खुमासदार भाषण करत स्टेजवरील मंडळी म्हणतात, पाटील जोमात आहे, पण डोंगराला आणि झाडाला बोलल्यावर पाटील जोमात आहे, नाहीतर आम्हाला कोण बोलवतय. डोंगर झाडी घेऊन आलो आहे.. यावेळी त्यांनी काय झाडी, काय डोंगर हा डायलॉग देखील बोलून दाखवला.
इतर महत्वाच्या बातम्या