Gopichand Padalkar On NCP : राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा, तो पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो; इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
Gopichand Padalkar On NCP : इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने कव्वाली कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याचे समोर आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे.
![Gopichand Padalkar On NCP : राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा, तो पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो; इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल NCP is full of hooliganism party only cares for hooligans sharp Attack of Gopichand Padalkar on ncp islampur firing Gopichand Padalkar On NCP : राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा, तो पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो; इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/14/036511715de5f7c42f871ff3a44cf22b166575412912988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gopichand Padalkar On NCP : इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने गोळीबार केल्याचे समोर आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी (Gopichand Padalkar On NCP) हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा असून तो पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो, अशा शब्दात राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले आहे.
इस्लामपूर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. पीरअली पुणेकर असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. हत्यार परवाना शर्तीचे व शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन आणि दहशत माजवल्याबदल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार झालेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar On NCP) प्रतिक्रिया देताना म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार असून कारवाईसाठी सूचना करणार आहे. राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा आहे आणि अशाच गुंड लोकांना हा पक्ष सांभाळतो, पण सरकार बदलले आहे हे त्यांच्या लक्षात नसावं. अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई होईल.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
दरम्यान, इस्लामपूर पोलिसांनी व्हिडीओची तपासणी करत पीरअली पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करत गोळीबार प्रकरणी पुणेकर यास अटक केल्याची माहिती इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.
इस्लामपूर येथील मोमीन मोहल्ला परिसरात कव्वाली कार्यक्रमामध्ये हा गोळीबार झाला होता. व्यासपीठावरुन कव्वाली सुरु असताना हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. इस्लामपूर शहरात ख्वाजा गरीब नवाज सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त अमिल आरिफ साबरी कादरी यांच्या शानदार कव्वालीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कवालीचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमांमध्येच एका व्यक्तीने व्यासपीठावरून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कार्यक्रमांमध्ये या व्यक्तीकडून पिस्टल काढून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा हा व्हिडिओ होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पीरअली पुणेकर यांनी हा गोळीबार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यात एकच खळबळउडाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)