MNS Protest On Toll : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगलीत मनसे आक्रमक; रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विनाटोल सोडली वाहनं
MNS Protest On Toll : मनसे कार्यकर्त्यांनी थेट चारचाकी वाहन विना टोल सोडून दिली. यावेळी संतप्त मनसे कार्यकर्ते आणि पोलीस व टोल कर्मचाऱ्यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार देखील घडला.
![MNS Protest On Toll : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगलीत मनसे आक्रमक; रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विनाटोल सोडली वाहनं MNS Protest On Toll MNS aggressive after Raj Thackeray warning Vehicles left without toll on Ratnagiri Nagpur highway MNS Protest On Toll : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगलीत मनसे आक्रमक; रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विनाटोल सोडली वाहनं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/be0853a9f5fa308a168f6d5590b416611696859305486736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील टोल नाक्यांवरून दिलेल्या इशाऱ्यानंतर (MNS Protest On Toll) सांगली जिल्ह्यातही (Sangli News) पडसाद उमटले. कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोणनजीक रत्नागिरी-नागपूर महामार्गावर बोरगाव टोलनाक्यावर मनसेनं चारचाकी वाहन विनाटोल सोडून दिली. मनसे कार्यकर्त्यांनी थेट चारचाकी वाहन विना टोल सोडून दिली. यावेळी संतप्त मनसे कार्यकर्ते आणि पोलीस व टोल कर्मचाऱ्यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार देखील घडला. मात्र, मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुमारे तासभर या टोलनाक्यावरून फ्रीमध्ये मनसे स्टाईलमध्ये चारचाकी वाहने सोडली. टोलनाक्यावर असणाऱ्या दर फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काळे फासण्यात आले.
कार्यकर्त्यांना थांबवल्यास राज्यातील टोलनाके पेटवू
दुसरीकडे, छोट्या वाहनांना टोल आकारण्यातून सूट मिळावी. कार्यकर्त्यांना थांबवल्यास राज्यातील टोलनाके पेटवू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) राज्य सरकारला दिला आहे. टोल बुथ हे राजकारण्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले की, 'मी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. या बैठकीतून काय निष्पन्न होते ते पाहू. अन्यथा उपमुख्यमंत्र्यांचे विधान लक्षात घेऊन मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक टोल बुथवर जमतील आणि चार, तीन आणि दुचाकी वाहनांकडून टोल वसूल होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आम्हाला रोखले तर आम्ही टोलनाके पेटवू. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत येथे सर्वच राजकीय पक्ष सत्तेवर आले, परंतु महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत.
मनसैनिक आक्रमक, पहिला टोलनाका पेटवला!
राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या (Toll) इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी (MNS supporters) पहिला टोलनाका आज पेटवून दिला. मुंबईतील मुलुंड टोलनाका मानसैनिकांनी पेटवला. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)