एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगलीत घरापासून हाकेच्या अंतरावर तरुणाचा गॅस स्टोव्ह डोक्यात घालून निर्घृण खून, किरकोळ वादात चौघांचे कृत्य

वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. 

सांगली : सांगली शहरातील (Sangli Crime) संजयनगर झेंडा चौक परिसरात तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृणपणे खून (Murder In Sangli) करण्यात आला. नितीन आनंदराव शिंदे (वय 32, रा. संजयनगर, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या खुनात चौघांचा सहभाग असल्याचा पोलिसांना अंदाज असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. किरकोळ वादातून हा खून चौघांनी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.  नितीनच्या घरासमोर हाकेच्या अंतरावर हा खून झाला. अवघ्या दोनशे फुटाच्या अंतरावर झाला आहे. 

गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला

नितीन शिंदे संजयनगरमध्ये खेराडकर पेट्रोलपंपाजवळ झेंडा चौकात राहण्यास होता. त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करत होता. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामावरून परतल्यानंतर काल रविवारी सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. त्यांच्यात किरकोळ कारणातून वादावादी झाली. त्यानंतर अर्धा तासाने नितीन घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. 

खून किरकोळ कारणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर

रक्तस्त्राव झाल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. हा खून किरकोळ कारणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अद्याप ठोस कारण समजू शकले नाही. खूनाची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरिक्षक सुरज बिजली, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये पाठवला.

खंडणी मागत धमकी देणाऱ्या तिघांना अटक

दरम्यान, सांगली शहरातील एका व्यक्तीकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागत त्यातील साडेसात लाख रुपये वसूल करत उर्वरित रकमेसाठी धमकी देणाऱ्य तिघाना पोलिसांनी जेरबंद केले. हे तिघेजण सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत होते. एका कृषी उद्योजकाकडे त्यांनी 15 लाखांची खंडणी मागत रक्कम दिली नाहीतर अॅट्राॅसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी सांगलीमधील मुकुंद हणमंत जाधवर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात (Sangli Crime) फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Embed widget