(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : सांगली : शेतजमिनीमध्ये रेल्वे ट्रॅक उभारलाl; शेतकऱ्यांनी पलुस तालुक्यात महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखली
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी तब्बल एक तासाहून अधिक काळ कोल्हापूर गोंदिया- महाराष्ट्र एक्स्प्रेस (Maharashtra Express stopped in Palus taluka) रोखून धरली.
सांगली : शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये रेल्वे ट्रॅक उभारल्याच्या निषेधार्थ आज (13 सप्टेंबर) सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी तब्बल एक तासाहून अधिक काळ कोल्हापूर गोंदिया- महाराष्ट्र एक्स्प्रेस (Maharashtra Express stopped in Palus taluka) रोखून धरली. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन या ट्रॅक संदर्भात निर्णय देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. वसगडेमधील शेतकरी, ग्रामस्थ व महिला मिळून गेल्या 10 महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक करताना शेतकऱ्यांच्या शेतात केलेले अतिक्रमण, बंद केलेले शेतरस्ते पूर्ववत चालू करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन सुरु आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून सातत्याने आंदोलन केलं जात आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही रेल्वे अडवलेली नाही, तर आम्ही आमच्या शेतीत येऊन बसलो आहे. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतही कार्यवाही करण्यात आलेली नाही. नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या