एक्स्प्लोर

Gopichand Padalkar: देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी माझे कान पकडू देत, तो त्यांचा अधिकार पण...; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं

Gopichand Padalkar: माझ्यावर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करता इथपर्यंत ठीक होतं, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीवर खालच्या पातळीवर टीका केली, म्हणून मी त्यांना बिरोबा बनातून झोडून काढलं, असंही पुढे पडळकरांनी म्हटलं आहे.

सांगली: गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील (Jayant Patil) विरुद्ध गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) असा संघर्ष रंगतो आहे. पडळकर यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) संस्कृती बचाव मोर्चा काढला. त्यानंतर भाजपने पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थनार्थ आंदोलने उभारली. कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्यात पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यातच बुधवारी भाजपकडून विकृतीचा रावण दहन आणि इशारा सभा घेण्यात आल्याने वाद आणखी चिघळला. सततच्या आरोप-प्रत्यारोपामुळे वाद संपण्याऐवजी तीव्र होत चालल्याचे चित्र दिसत असून ऐन नवरात्रीतच राजकीय वातावरण रंगत असल्याने "हा संघर्ष नेमका कधी थांबणार?" असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगलीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Gopichand Padalkar : म्हणून मी त्यांना बिरोबा बनातून झोडून काढलं

याआधी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊन देखील गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या चुकीच्या भाषेचे समर्थन केले आहे, सांगलीमध्ये झालेल्या सभेत पडळकर यांनी स्वतःच्या चुकीच्या भाषेचा समर्थन केलं आणि म्हणाले, 18 तारखेला मी जतमध्ये जे काही बोललो त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला त्यांनी मला सक्त सूचना दिल्या, त्यांनी मला परत असं परत बोलायचे नाही अशा सूचना दिली, याचा खुलासा मी मीडियासमोर केला आहे. चंद्रकांत पाटील यांचाही फोन आला, मी त्यांनाही सांगितलं की मी पुढे असे बोलणार नाही. 22 तारखेला महाराष्ट्र संस्कृती बचाव असा मोर्चा काढला. माझ्यावर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करता इथपर्यंत ठीक होतं, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीवर खालच्या पातळीवर टीका केली, म्हणून मी त्यांना बिरोबा बनातून झोडून काढलं, असंही पुढे पडळकरांनी म्हटलं आहे.   

Gopichand Padalkar : तेव्हा शरद पवारांनी फडणवीसांना  फोन का नाही केला?

नरेंद्र मोदी यांच्या आईचा एआय-जनरेटेड व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा शरद पवारांनी फडणवीसांना  फोन का नाही केला असा सवाल यावेळी पडळकरांनी उपस्थित केला आहे. 346 जाती असणाऱ्या ओबीसींसाठी फडणवीस सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं. अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी यासाठी आम्ही आंदोलने करत होतो, पण या जातीयवादी अवलादीने चार ओळींचे पत्रक काढणे शक्य झाले नाही. ते फडणवीस आणि मोदींनी करून दाखवलं. संपूर्ण देशभर अहिल्यादेवींची  जयंती साजरी झाली. पुढचा नेता कोण होणार हे भाजपला माहीत नसतं. नरेंद्र मोदी आले तेव्हा माहित नव्हतं की हेच पंतप्रधान होणार आहेच. त्याच्यानंतर पंतप्रधान कोण होईल हे देखील पक्षाला माहित नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर खालच्या पातळीवर बोलाल तर याद राखा, गोपीचंद पडळकर त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देईल. आम्ही गावाकडे खेळ खेळत असताना पोर आई बहिणी वरून आम्हाला शिव्या देतच होती, असंही पुढे पडळकरांनी म्हटलं आहे. 

Gopichand Padalkar :  फडणवीस, चंद्रकांत पाटील माझे कान पकडू देत तो त्यांचा अधिकार पण...

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीला विरोध करू शकता पण संपूर्ण ब्राह्मण समाजाला तुम्ही कशा शिव्या देऊ शकता, ही तुमची कुठली संस्कृती आणि संस्कार आहेत. ब्राह्मण समाजाला शिव्या देणे हे कदापि खपवून घेणार नाही. गोपीचंद पडळकर बोलले की त्यांची जीभ घसरली असे म्हणतात. मग मला शिव्या घातल्या त्याच्यावर का महाराष्ट्रात चर्चा झाली नाही. तुम्ही मला अरे म्हटलं तर मी कारे म्हणणार...मला एक कानाखाली माराल तर मी दोन कानाखाली मारेल. तुम्ही टीका केला तर मी टीका करणारच मग मला संस्कृतीचं काही देणंघेणं नाही. रोहित पवारांना त्यांच्या काटेवाडी गावामध्ये बिरोबाचे मंदिर आहे हेच माहीत नाही. मला आता बिरोबांने सांगितले मस्तवाल लोकांना आणून काप... हा मला बिरोबाने दिलेला आदेश आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी माझे कान पकडू देत तो त्यांचा अधिकार आहे, पण राष्ट्रवादीवाला मला आरे, कारे केला तर ते मी कदापी खपवून घेणार नाही, त्याचबरोबर जयंत पाटलांना भाजपमध्ये घेऊ नका अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी भाषणातून चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
Embed widget