सांगलीच्या 'हँग ऑन' कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटनेने कॅफे फोडायचा सपाटाच लावला
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणाची आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
सांगली : सांगलीत (Sangli News) कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणाची आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. कॅफेमध्ये गैरप्रकार घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफेची तोडफोड करण्यात येत आहे. सांगलीतील कॅफे हंग ऑन असे कॅफेत गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. आज या घटनेचे पडसाद उमटले आहेत. संतप्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक घेतला आहे. आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफेची तोडफोड केली आहे.
यापुढे आम्ही शांत बसणार नाही....
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी दिगंबर साळुंखे म्हणाले, गेली दोन वर्षे आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करत अनाधिकृतपणे सुरू असलेले कॅफे बंद करण्याची मागणी करत आहे. कॅफेमध्ये घडणारे गैरप्रकार लक्षात अल्पवयीन मुलांचे-मुलीचे शोषण थांबवा, अशी मागणी केली. सहा महिन्यापूर्वी शहरातील अशीच घटना समोर आली होती. एका कॅफेमध्ये मुलामुलींना ‘अंधारी खोली’सारखी व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. त्यामध्ये प्रायव्हेट केबीन असतात त्यामध्ये अल्पवयीन मुलीचे शोषण केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्य मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. सहा महिन्यांपासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. तक्रार केली तरी संबंधित कॅफे चालकाने जे करायचे ते सुरुच ठेवले होते. सहा महिन्यातील ही दुसरी घटन आहे.आता इथून पुढे आम्ही शांत बसणार नाही.
कॅफे बंद करा अन्यथा कॅफेसह मालकांना फोडून, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्ताचा इशारा
अशा पद्धतीचे कॅफे जिथे सुरु आहेत तिथे फोडून बंद करण्यात येईल असा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्ताने दिला आहे. तसेच कॅफे मालकांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने अशा कॅफेवर आणि कॅफे मालकांवर कारवाई करावी, अन्यथा असे कॅफे तसेत त्यांच्या मालकांना फोडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
काय आहे प्रकार?
पीडत मुलीला शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफे शॉपमध्ये नेले. तेथे कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढले. नंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले.