सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; प्रतीक पाटलांचा मुलगा हर्षवर्धनही संचालकपदी
हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादांची चौथी पिढी सहकारी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात आली आहे. वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

सांगली : सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. 123 इच्छुक उमेदवारांचे अर्ज माघारी घेत इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडविण्यात खासदार विशाल पाटील यशस्वी झाल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आष्टा, मिरज, सांगली आणि अनुसूचित जाती व जमाती गटात इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडविण्यात आल्यामुळे ही कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. वसंतदादा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी 144 इच्छुकांनी अर्ज भरले होते. 123 इच्छुकांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे 21 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात
दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री व वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांचा मुलगा हर्षवर्धन यांची वसंतदादा कारखान्यात संचालकपदी बिनविरोध निवड झाली. हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून वसंतदादांची चौथी पिढी सहकारी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात आली आहे. वसंतदादा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.
वसंतदादा कारखान्याचे नूतन संचालक
- सांगली गट : बाळासो पाटील, दिनकर साळुंखे, हर्षवर्धन पाटील
- मिरज गट : दौलतराव शिंदे, शिवाजी कदम, तानाजी पाटील
- आष्टा गट : संजय पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, विशाल चौगुले
- भिलवडी गट : यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत-पाटील, अमित पाटील
- तासगाव गट: अंकुश पाटील, उमेश मोहिते, गजानन खुजट
- उत्पादक सहकारी संस्था गटः खासदार विशाल पाटील
- अनुसूचित जाती-जमाती गटः विशाल चंदूरकर
- महिला सदस्याः सुमित्रा खोत, शोभा पाटील
- इतर मागासवर्गीय जाती गट: अंजुम लुकमान महात.
- भटक्या 'विमुक्त जाती व जमाती गट : प्रल्हाद गडदे
इतर महत्वाच्या बातम्या























