एक्स्प्लोर

Sangli News : बैलाला काय उत्तर द्यायचं? हा एकच सवाल अन् डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील चितपट! घेतला मोठा निर्णय

चंद्रहार पाटलांनी गोवंश संवर्धन डोळ्यासमोर ठेवत दोन्ही बैलांना एक-एक थार देण्याचा निर्णय जाहीर केला आणि सांगलीमध्ये बकासूर आणि महिब्याच्या मालकांना थार गाडी बुकिंगच्या पावत्या प्रदान केल्या.

Sangli News : "एक अनार, दो बिमार' ही म्हण आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण एक शर्यत पार पडल्यानंतर बक्षीसाच्या वाटपावरून असाच काहीसा प्रकार सांगलीमध्ये घडला. देशातील सगळ्यात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीमध्ये बकासूर आणि महिब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी जिंकली. मात्र, यानंतर थार गाडी कोण घेणार? यावरून तिढा निर्माण झाला होता. अखेर आयोजक असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी थेट दोन्ही मालकांना प्रत्येकी एक-एक थार गाडी देऊन टाकली आहे. 

सांगलीच्या भाळवणीमध्ये नुकतीच देशातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि कराडच्या रेठरेमधील महीब्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला. लाखो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थितीत थरार पार पडला. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रभरातील 2 लाखांच्या आसपास बैलगाडा शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. 

शर्यत होऊन सहा दिवस उलटूनही थार गाडीचं वाटप नाही 

शर्यतीत बकासूर आणि महिब्या या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे थार गाडीचे पटकावले होते. मात्र, थार गाडी कोणी घ्यायची? असा तिढा निर्माण झाला होता. शेवटी चंद्रहार पाटील यांनी दोन्ही बैल मालकात थार गाडीवरून वाद होऊ नये म्हणून बकासूर आणि महिब्या या दोन्ही बैलं मालकांना थार गाडी देण्याचा निर्णय घेत दिलदारपणा दाखवला. बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडीसाठी बकासूर आणि महिब्या ही बैल जोडी पळाली आणि दोघांनीही थार गाडी आपल्या पदरात पाडली. मात्र, दोन्ही बैलांची मालक वेगवेगळे असल्याने थार गाडी कोणाला मिळणार? किंवा कोण घ्यायची? हा तिढा निर्माण झाला होता. शर्यत होऊन सहा दिवस उलटूनही थार गाडीचं वाटप होऊ न शकल्याने अखेर बैलगाडी शर्यतीचे आयोजक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी दोन्ही बैल मालकांना बोलवून चर्चा केली. 

सुमारे चार तास थार गाडी कोणाला द्यायची याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, कोणाला गाडी मिळणार? यावर एकमत होत नव्हतं. यामुळे चंद्रहार पाटलांनी मग बकासूरच्या मालकाला थार गाडी द्यायचा निर्णय घेतला, पण महिब्या बैल मालक असणाऱ्या सदाशिव मास्तरने आपण आपल्या बैलाला काय उत्तर द्यायचं? हा सवाल केला आणि या भावनिक प्रश्नावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील चितपट झाले. मग चंद्रहार पाटलांनी गोवंश संवर्धन डोळ्यासमोर ठेवत दोन्ही बैलांना एक-एक थार देण्याचा निर्णय जाहीर केला आणि सांगलीमध्ये बकासूर आणि महिब्याच्या मालकांना थार गाडी बुकिंगच्या पावत्या प्रदान केल्या. त्यामुळे थार गाडी कोणाला मिळणार? निर्माण झालेला तिढा, तर सुटलाच, शिवाय प्रत्येक बैलाला एक- एक थार गाडी इतके भले मोठं बक्षीस देखील मिळाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
Embed widget