एक्स्प्लोर

Sangli Loksabha : सांगलीत 2019 ला वंचितच्या पडळकरांनी खेळ केला आता इर्ष्या अन् कुरघोडीत कोण कोणाचा खेळ करणार?

विशाल पाटील (Vishal Patil) हे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू व सांगलीचे माजी खासदार स्वर्गीय प्रकाशबापू पाटील यांचे सुपुत्र आहेत.

सांगली : कधीकाळी ज्या सांगलीत (Sangli) काँग्रेस (Congress) राजकारणाने राज्याच्या राजकारणावर ठसा उमठवला, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजकारणात सर्वदूर आपल्या नेतृत्वाची आणि प्रतिभेची छाप सोडली त्याच वसंतदादा पाटील घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे एकमेकांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याच्या नादात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपामध्ये ठाकरे गटाकडून सांगलीच्या (Sangli Loksabha) जागेचा अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा करण्यात आला आणि चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्याच उमेदवारीवर अंतिम जागावाटपात शिक्कामोर्तब करण्यात आले.  

कोण कोणाचा बळी देणार?

गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे. हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे 2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्यावर आली. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो इर्ष्येचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरु आहे त्यामध्ये कोण कोणाचा बळी देणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. सांगलीच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार? यामध्येही खेळ रंगणार आहे.

कोण आहेत विशाल पाटील? (Who Is Vishal Patil) 

विशाल पाटील (Vishal Patil) हे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू व सांगलीचे माजी खासदार स्वर्गीय प्रकाशबापू पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे राजकारण, समाजकारण, सहकारचा वारसा त्यांना घरापासूनच मिळाला आहे. सांगली जिल्ह्यात असणारा जनसंपर्क व राज्य तसेच राष्ट्रपातळीवरील नेत्यांशी असणारे वैयक्तिक संबंध जमेच्या बाजू आहेत. 2016 मध्ये विशाल पाटील वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष झाले. 11 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत वसंतदादा पॅनलला सर्व 21 जागा मिळाल्या होत्या. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. यामुळे राज्यपातळीवरही त्यांच्या नेतृत्वाचा कस लागत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी

विशाल पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती. आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करत पदयात्रा तसेच विविध मोर्चे, आंदोलनाच्या  माध्यमातून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगलीमध्ये आणूनही वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेसला सुटल्यास आणि महाविकास आघाडीसाठी असलेले पोषक वातावरण पाहता विशाल पाटील यावेळी नक्की बाजी मारतील, अशी एकंदरीत परिस्थिती होती. मात्र, कोल्हापूरची ठाकरेंची जागा काँग्रेसला गेल्याने सांगलीच्या जागेचा तिढा निर्माण झाला. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांचा अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रवेश करून सुद्धा उमेदवारी जाहीर करत प्रतिष्ठेचा मुद्दा केला.

विश्वजित कदमांकडून शर्थीचे प्रयत्न

सांगलीची जागा काँग्रेसला सुटण्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी ठाकरेंशी दोन हात करताना पक्षातील नेत्यांची दिल्लीपर्यंत जाऊन भेट घेतली. मात्र, काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना सबूरीचा सल्ला दिला. यानंतरही विश्वजित कदम आक्रमक होत असल्याने संजय राऊत यांनी नाव न घेता तोफ डागल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. मात्र, अंतिम जागावाटपात जागा ठाकरेंनाच गेली आहे. ठाकरे यांनी भाजपविरोधा रान उठवलं असल्याने काँग्रेस हायकमांडने ठाकरेंना कोणत्याही प्रकारे नाराज करण्याचे धाडस केलेलं नाही हे जागावाटपावरून स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्येही चार जागा ठाकरे गटाकडे आहेत. 

सलग दुसऱ्यांदा उमेदवारीसाठी संघर्ष 

2014 मध्ये जागा गमावल्यानंतर 2019 मध्येही दादा घराण्याला उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागला. काँग्रेसने स्वाभिमानीला जागा सोडल्यानंतर अखेरच्या क्षणी विशाल पाटील रिंगणात उतरले. मात्र, वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तीन लाखांवर मते घेत विशाल पाटलांचा खेळ बिघडवत भाजपच्या संजय पाटलांचा दुसऱ्यांदा मार्ग सुकर केला. आताही त्याच मार्गाने ही लढत जात असून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे  आमचं चुकलं काय अशी चर्चा विशाल पाटील समर्थक करत आहेत. 

काय आहे सांगली लोकसभेचा इतिहास?

सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ  सांगली लोकसभेला येतात. मिरज, सांगली, पलूस कडेगाव, खानापूर आटपाडी, तासगाव कवठेमहांकाळ आणि जत या मतदारसंघाचा समावेश सांगली लोकसभेमध्ये होतो. आज घडीला मिरज आणि सांगलीमध्ये भाजपचे आमदार आहेत. पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम आमदार आहेत. खानापूरचे आमदार शिंदे गटाचे अनिल बाबर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने ती जागा रिक्त आहे, तर सुमनताई पाटील या तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याच्या आमदार आहेत. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत आमदार असून विश्वजित कदम यांचे नात्याने बंधू आहेत. 

सांगली लोकसभेला वसंतदादा घराण्याचा वरचष्मा

आजवरचा सांगली लोकसभेचा इतिहास पाहिल्यास या मतदारसंघावर वसंतदादा पाटील घराण्याचाच पगडा राहिला आहे. 1980 दशकामध्ये पहिल्यांदा वसंतदादा पाटील या मतदारसंघातून खासदार झाले होते. यानंतर त्यांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांनी 1984 1989 आणि 1991 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवताना खासदारकीची हॅट्रिक केली. 1996 आणि 98 मध्ये मदन पाटील यांनी खासदारकी लढवली होती. त्यानंतर पुन्हा 1999 ते 2004 या कालावधीमध्ये प्रकाशबाबू खासदार होते. यानंतर 2006 आणि 2009 मध्ये प्रतीक पाटील यांनी या सांगली लोकसभेतून विजय मिळवला होता. त्यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा मिळाले होते. त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेमध्ये संजयकाका पाटील भाजपचे पहिल्यांदाच खासदार झाले. त्यामुळे हा वसंतदादा पाटील घराण्यासाठी मोठा राजकीय धक्का होता. 2019 मध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या तीन लाखांवर मतांनी विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Embed widget