(Source: Poll of Polls)
Pratik Patil Meets Prakash Ambedkar : विशाल पाटलांचे बंधू भल्या सकाळी प्रकाश आंबडेकरांच्या भेटीला, सांगलीतून मैदानात उतरण्याची चिन्हं, मविआचं गणित बिघडवणार!
Pratik Patil Meets Prakash Ambedkar : काँग्रेस नेते प्रतीक पाटील यांनी आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने सांगलीच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Vishal Meets Prakash Ambedkar : सांगलीमध्ये (Sangli Loksabha) शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठा पणाला लावून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार भूमिकेत असलेल्या काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासाठी आता बंधू प्रतीक पाटील यांनी आज (10 एप्रिल) सकाळीच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने सांगलीच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विशाल पाटील आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
काँग्रेसला अस्तित्व ठेवायचे की नाही?
प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? अशी विचारणा आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान सांगलीमध्ये शिवसेनेत ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सजेशन दिलं नसल्याचे आंबेडकर म्हणाले.
विशाल पाटलांना उमेदवारी दाखल करण्याचा सल्ला
माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या अकोल्यातील 'यशवंत भवन' या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. यानंत निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाल्याने सांगली काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.
सांगलीमध्ये बोलावली बैठक
दरम्यान, सांगलीच्या जागेसाठी दिल्लीपर्यंत मजल मारूनही ठाकरेंनाच जागा सुटल्याने सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडाचा झेंडा उभारणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. आज सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या चर्चेचा तपशील विशाल पाटील कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या