Baidgada Sharyat Race Final Sangli: 1..2..3 स्टार्ट....बैलगाड्या शर्यतीच्या अंतिम लढतीत काय घडलं? अंगावर काटा आणणारा क्षण, VIDEO
Baidgada Sharyat Race Final Video Sangli: लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत अत्यंत थरारक, अशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे.

Baidgada Sharyat Race Final Video Sangli: देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचे (Baidgada Sharyat) पैलवान चंद्रहार पाटलांकडून 500 एकर मैदानावर आयोजन केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैल शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या (helicopter baijya) आणि ब्रेकफेल (brake fail jodi) बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली. तर दुसरी फॉर्च्यूनर गाडी लखन (Lakhan) आणि सर्जा (Sarja) या बैलजोडीने जिंकली.
सदर शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू बक्षीसाची घोषणा केली आहे. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान सांगलीच्या तासगाव-बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे पार पडलं.फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या.
हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारले- (Helicopter Baijya Brake Fail Jodi)
लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत अत्यंत थरारक, अशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैज्या (helicopter baijya) आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे. दरम्यान, या बैलगाड्या शर्यतीच्या फायनलचा थरारक व्हिडीओ (Baidgada Sharyat Final Video Sangli) समोर आला आहे. बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे जाहीर केले आहे.
























