Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या- ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कार मिळणार
Sangli Bailgada race: हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडीने मारले मैदान, पटकावली मानाची फॉर्च्युनर, श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीला प्रेक्षकांची मोठी गर्दी.

Sangli Bailgada race: चंद्रहार पाटील यांनी सांगलीत आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचा निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर झाला. अलिशान गाड्या आणि आकर्षक बक्षीसांमुळे ही बैलगाडी शर्यत (Bailgada race) राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. या स्पर्धेत हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल या बैलजोडीने मैदान मारत मानाची फॉर्च्युनर गाडी (Fortuner Car) जिंकली. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडी जिंकल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून बैलगाडी मालक आणि शर्यतीचा शौक असणारे दर्दी प्रेक्षक आले होते. (Sangli News)
देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचे पैलवान चंद्रहार पाटलांकडून 500 एकर मैदानावर आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैल शर्यती पार पडल्या. ज्यामध्ये हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली तर दुसरी फॉर्च्यूनर गाडी लखन आणि सर्जा या बैलजोडीने जिंकली. हे शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू बक्षीसाची घोषणा केली आहे.
बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान म्हणून गवगवा झालेल्या सांगलीच्या तासगाव- बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे ही स्पर्धा पार पडली. फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150 दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या. लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत अत्यंत थरारक, अश्या पार पडलेल्या बैलगाडी शर्यती मध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे. बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे जाहीर केले आहे.
Eknath Shinde in Sangli: मी एवढी गर्दी कधी पाहिली नाही, बैल म्हणजे सेलिब्रिटी आहेत: एकनाथ शिंदे
या बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले की, ‘आज येथे धुरळा उडाला आहे. रेकॉर्ड ब्रेक बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरवली आहे. एखाद्या फिल्मस्टारला जेवढी गर्दी होत नाही. तेवढी गर्दी माझ्या या लाडक्या बैलांना पाहण्यासाठी येथे झाली आहे. मी एवढी गर्दी कधी पाहिली नाही. ज्या बैलांनी भाग घेतला आहे. ते आपले सेलिब्रिटी आहेत', असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
आणखी वाचा
























