एक्स्प्लोर

Sangli News : सांगलीतील खानापूर घाटमाथ्यावर मिळतो चक्क हवेवर पिकवलेला गहू! एका पावसाच्या पाण्यावर खत आणि औषधांशिवाय पिकतो हवेवर

Sangli News : या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. खानापूर घाटमाथ्यावर काही मोजक्या क्षेत्रात तेथील हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या जीवावर हा गहू पिकतो.

Agriculture News : सांगली जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) घाटमाथ्यावर केवळ एका पावसाच्या पाण्यावर कुठल्याही खत आणि औषधांशिवाय चक्क हवेवर पिकत असलेला गहू (Wheat) येतो. घाटमाथ्यावरचे हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारे हा गहू पिकवला जातो. या भागात या बिनपाण्याच्या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. खानापूरच्या घाटमाथ्यावरच्या या गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर हा गहू येतो.

केवळ गार हवेवर गहू पिकतो

एका पावसाच्या पाण्यावर कुठल्याही खत आणि औषधांशिवाय खानापूरच्या घाटमाथ्यावर केवळ गार हवेवर गहू पिकतो. या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. खानापूर घाटमाथ्यावर काही मोजक्या क्षेत्रात तेथील हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या जीवावर हा गहू पिकतो. त्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण गहू मानला जातो. या गव्हाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर येतो. पुन्हा पाणी द्यावं लागत नसल्याने एकदा पेरल्यानंतर काढायलाच जायचे, असा काहीसा प्रकार याबाबतीत होतो.

विशेष म्हणजे दुष्काळी, कमी पावसाच्या इतर कुठल्याही पट्ट्यापेक्षा खानापूर घाटमाथ्यावर या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. एक तर या पिकाला मध्यम स्वरुपाची जमीन लागते आणि वातावरण कोरडे असले तरी गारवा आवश्यक असतो. या दोन्ही गोष्टी खानापूर घाटमाथ्यावरील रेणावी, रेवणगाव, घोटीखुर्द, घोटी बुद्रुक घोडेवाडी, ऐनवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, तामखडी अडसरवाडी या घाटमाथावरील गावच्या शेतामध्ये मिळतात. खानापूर घाट माथ्यावर 8 ते 10 गावांत मिळून किमान 125 ते 150 एकरात या शेत गहू पिकाचे उत्पन्न घेतले जातो. त्याला 'हवेवरचा गहू' असंही म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणा पेक्षा हा वेगळा असतो. या शेतगव्हाचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो.

शेत गव्हाची वैशिष्ट्ये

या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात. याचे बियाणे स्वतंत्रपणे या भागातील शेतकऱ्यांकडे संरक्षित केलेले आहे.

शेत गव्हाची पेरणी होते कधी?

साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला म्हणजे दसरा झाल्यानंतर या गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यात हे पीक येते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असते. रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. एकरी 20 किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यात एरवी 5 ते 6 क्विंटल (कधी कधी 6 ते 7 पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्यामुळे सध्या परंपरागत काही लोकांकडेच उपलब्ध आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Embed widget