अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा कोकणकरांना फटका; रत्नागिरी हापूस निर्यात महागणार
Ratnagiri: अमेरिका आणि युरोपमध्ये रत्नागिरी हापूसच्या पलकची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते

Ratnagiri : अमेरिकेने भारतासह काही देशांच्या कृषी उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयाचा थेट फटका कोकणातील आंबा पल्प उद्योगालाही बसणार आहे. विशेषतः रत्नागिरी हापूसच्या पल्पची मोठ्या प्रमाणावर निर्यात अमेरिका आणि युरोपमध्ये होते. आता या पल्पच्या किमती २५ टक्क्यांनी वाढणार असल्याने निर्यातदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
भारतातून दरवर्षी सुमारे १५ हजार मेट्रिक टन आंबा पल्प निर्यात केला जातो. यापैकी सुमारे ३०० कोटी रुपयांचा पल्प अमेरिकेला पाठवला जातो. कोकणातून एकट्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून सुमारे ५० कोटी रुपयांचा हापूस पल्प अमेरिका, युरोप आणि गल्फ देशांत पाठवला जातो. मात्र, अमेरिकेने लागू केलेल्या नव्या टॅरिफमुळे या पल्पवर आता अतिरिक्त १२.५ कोटी रुपयांचा कर बसणार आहे. परिणामी, अमेरिकन बाजारात हा पल्प २५ टक्के महाग होईल आणि ग्राहकांमध्ये त्याची मागणी कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोकणात हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या आंब्यापासून तयार होणारा पल्प केवळ देशात नव्हे, तर परदेशातही अत्यंत लोकप्रिय आहे. विशेषतः अमेरिकेत कोकणातील पल्पची मागणी अधिक आहे. त्यामुळे हा टॅरिफ निर्णय कोकणातील शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांसाठी आर्थिक नुकसान करणारा ठरणार आहे.
"रासायनिक पदार्थ न वापरता नैसर्गिक पद्धतीने तयार होणारा हापूस पल्प ही आमची खासियत आहे. पण आता अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे आम्ही स्पर्धेत टिकू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे," असं मत रत्नागिरीमधील एका पल्प निर्यातदाराने व्यक्त केलं.
निर्यातदार संघटनांनी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॅरिफचा फेरविचार व्हावा, अथवा भारत सरकारने काही सवलती जाहीर कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, आगामी काळात पल्प निर्यातीत घट होण्याचा धोका आहे, असं व्यापाऱ्यांचं म्ह
णणं आहे.























