एक्स्प्लोर

Ratnagiri News : अतिवृष्टीमुळे वाशिष्टीवरील साकव वाहून गेला, दुरुस्तीसाठीचा निधी कागदावरच, साफरोलीकरांचा जीवघेण्या प्रवासाकडे नवं सरकार लक्ष देणार?

Ratnagiri News : साफरोली गावात जाण्यासाठी वाशिष्टीवर साकव बांधण्यात आला होता. आता हा लोखंडी साकव राहिलेला नाही. कारण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत हा पूर्ण वाहून गेला आहे. आता राहिलाय तो फक्त लोखंडी सांगाडा. साकव वाहून गेल्याने गावातील दळणवळणाचा मार्गच बंदच झाला आहे.

Ratnagiri News : अतिवृष्टीमुळे कोकणातील (Kokan) अनेक गावागावांत प्रचंड नुकसान झाले. रत्नागिरीतील (Ratnagiri) वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील साकव, पूल अक्षरशः वाहून गेले. अतिवृष्टी होऊन एक वर्ष होऊन गेलं पण अतिवृष्टीमुळे झालेल्या काही गावांच्या समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. साकव वाहून गेल्याने गावातील दळणवळणाचा मार्गच बंदच झाला आहे. पण गावकऱ्यांनी मानवनिर्मित साकवावरुन ये-जा सुरु केली आहे, पण ही जीवघेणी कसरत आहे.
 
कोकणात जुलै 2021 मध्ये अतिवृष्टी झाली. धो-धो कोसळणारा पाऊस आणि गावच्या नद्यांना येणारा पूर. त्यात कोकणातील काही गावे सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने तिथे पावसाचे प्रमाणही जास्त. जिथे वाशिष्टी नदीचा (Vashishti River) उगम होते ते खेड तालुक्यातील चोरवणे गाव. हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तिथेच वाशिष्टी नदीचा उगम होतो आणि या उगमापासून जवळपास चार ते पाच किलोमीटर असलेले साफरोली गाव (Safroli Village). या गावात जाण्यासाठी वाशिष्टीवर साकव बांधण्यात आला. यावरुनच गावातील रहिवासी आपले दैनंदिन जीवन जगण्याची लागणाऱ्या गरजा, वस्तूसाठी शहराकडे याच साकवावरुन ये-जा करत. आता हा लोखंडी साकव राहिलेला नाही. कारण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत हा पूर्ण वाहून गेला आहे. आता राहिलाय तो फक्त लोखंडी सांगाडा.

डोलीतून नेताना नदीपात्रातून जाताना गावकऱ्यांची मोठी कसरत

नदीवरील साकव वाहून गेल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. गावात एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याला डोलीतून न्यावं लागतं. गावातील गावकऱ्यांनी दोन लांबलचक बांबूच्या साहाय्याने तयार केलेली गोलाकार लाकडी डोली. गावात यायला रस्ता नाही त्यामुळे डॉक्टर सुद्धा इकडे येत नाहीत. डोलीतून नेताना या नदीपात्रातून जाताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

मुलांच्या शाळेचा खोळंबा, सुख-दु:खाच्या कार्यक्रमापासून माहेरवाशिणी दूर

एवढंच नाही तर गावातील मुलांच्या शाळेचाही खोळंबा होत आहे. पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असल्याने मुले शाळेत जात नाहीत. गावातील माहेरवाशीण गावत असलेल्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होण्यासाठी गावात यायचं म्हटलं तर या साकवावरुन जीव हातात घेऊन नदी पार करावी लागते.

गावकऱ्यांच्या जीवघेण्या प्रवासाकडे नवं सरकार लक्ष देणार? 

गावकरी गेली वर्षभर सरकारी दरबारी या साकवासंदर्भात दुरुस्ती किंवा नवा पूल व्हावा यासाठी फेऱ्या मारत आहेत, पण कोणीही याकडे लक्ष देत नाहीत.
अतिवृष्टीत बाधित झालेल्या गावातील पूल किंवा साकवांच्या नव्याने उभारणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी निधीची घोषणाही केली. मात्र तो निधी आजवर कागदावरच राहिला. त्याची अंबलबजावणी अद्यापही झाली नाही. सरकारी कामाच्या अनास्थेचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेले सरकार तरी याकडे लक्ष देणार का, या साकवावरुन जीवघेणा गावकऱ्यांचा प्रवास थांबेल का हे पाहावं लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raigad Land Mafia: आमच्या गावात जमीन विकायला बंदी, कोकणातील गावचा आदर्श निर्णय
Gadchiroli Rising: गडचिरोली आता राज्याचं प्रवेशद्वार; लवकरच ग्रीन स्टील हब होणार
Nagpur Geeta Pathan: Nagpur मध्ये हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गीतापठण, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची उपस्थिती
Sangli Wedding: 'अनावश्यक खर्चाला फाटा', सांगलीत क्रांतिप्रेरणा विवाह, हुतात्म्यांना दिली मानवंदना
NCP Vs NCP: 'महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादीत रूपाली विरुद्ध रूपाली, संघर्ष पेटला,

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Embed widget