पुढील 4 तास महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा, मच्छीमार अलर्ट मोडवर, बोटी दाभोळ बंदरात दाखल
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Fishermen : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोकण किनारपट्टी ओलांडत असल्यामुळं जोरदार वाऱ्याच्या शक्यतेने मच्छीमारांच्या सगळ्या बोटी रत्नागिरीतील दाभोळ बंदरात दाखल झाल्या आहेत. मच्छीमार अलर्ट मोडवर आहेत.
पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज
दापोलीमध्ये केंद्र असल्यामुळं प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सद्य स्थितीत दापोलीतील हवामान स्थिर आहे. मात्र, पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल, दोन दिवसात महाराष्ट्रात आगमन होणार
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. तर मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मोसमी पाऊस आज (24 मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी 1 जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. 2009 नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचं IMD नं म्हटलं. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले भरले आहेत. दरम्यान, यावर्षी दरवर्षीपेक्षा लवकर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्रात देखील पुढच्या दोन दिवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:























