एक्स्प्लोर

Ratnagiri News : मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यापाठोपाठ पदाधिकारी, कार्यकर्ते अडचणीत; तिघांना बेड्या

Ratnagiri News : मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यापाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी काल अटक केली.

Ratnagiri News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील (Ganeshotsav 2022) लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी (Khed Police) काल (20 ऑक्टोबर) अटक केली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये आणि केदार वणंजू या तिघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात आज (21 ऑक्टोबर) वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर हे नॉट रीचेबल आहेत. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून रत्नागिरीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत. अटकपूर्व जामीन मंजूर न झाल्यास वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सावातील लॉटरी घोटाळा प्रकरणात वैभव खेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा
मनसेचे राज्य सरचिटणीस आणि राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसंच माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. मनसेच्या वतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये विनापरवानगी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करुन लोकांकडून पैसा गोळा केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली होती. अरबाज असगरअली बडे यांच्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाण्यात वैभव खेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या लकी ड्रॉसाठी लोटे एमआयडीसीमधील कोणकोणत्या कंपन्यामधून किती रक्कम गोळा केली याबाबत चौकशी होण गरजेचे आहे, अशी मागणीही तक्रारदार अरबाज असगरअली बडे (खेड) यांनी केली आहे.

गैरव्यवहाराचा ठपका ठेवत माजी नगराध्यक्ष खेडेकर सहा वर्षांसाठी अपात्र
दरम्यान, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर यापूर्वीच गैरव्यवहाराचा आरोप ठेवत सहा वर्षांसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले होते. आता पुन्हा गणेशोत्सव स्पर्धेतील लकी ड्रॉ प्रकरणी खेडेकर यांचा पाय खोलात गेला आहे.

इतर महत्त्वाची बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
Embed widget