Crime News: पित्याच्या मानेवर सुरा ठेवला; आईकडे खंडणी मागितली, वडिलांचा हात-पाय, तोंड प्लास्टिक टेपने बांधलेला फोटो काढून...गुगल पे वापरला अन् सापडला
Ratnagiri Crime News: श्रीकांत आपल्या वडिलांकडे सातत्याने पैशांची मागणी करत होता. सोमवारी तो पुण्यातून देवरुखला आला आणि घरी आल्यानंतर पुन्हा पैशांवरून वाद झाला.

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख तालुक्यातील एका घरात सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी धक्कादायक घटना घडली. आपल्या ८० वर्षीय जन्मदात्या पित्याच्या गळ्यावर सुरी (Ratnagiri Crime News) ठेवून आणि हात-पाय बांधून खंडणी मागणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. संशयिताचे नाव श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. पुणे) आहे. पोलिसांनी त्याला चिपळूणमध्ये ताब्यात घेतले.(Ratnagiri Crime News)
Ratnagiri Crime News: आपल्या आईसमोरच वडिलांच्या मानेवर सुरा ठेवून
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत आपल्या वडिलांकडे सातत्याने पैशांची मागणी (Ratnagiri Crime News)करत होता. सोमवारी तो पुण्यातून देवरुखला आला आणि घरी आल्यानंतर पुन्हा पैशांवरून वाद झाला. रात्री सुमारे ११ वाजता, श्रीकांतने आपल्या आईसमोरच वडिलांच्या मानेवर सुरा ठेवून एक लाख रुपये दे, नाहीतर त्यांना ठार मारतो अशी धमकी (Ratnagiri Crime News)दिली. या घटनेमुळे घरातील सर्वजण घाबरले. त्यानंतर श्रीकांतने वडिलांना जबरदस्तीने कपडे घातले आणि त्यांना दुचाकीवर बसवून घरातून बाहेर नेले.
Ratnagiri Crime News: हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने बांधलेला फोटो
अपहरणानंतर श्रीकांतने वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने बांधलेला फोटो आपल्या आईला व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि एक लाख रुपये खंडणी मागितली. तसेच नकार दिल्यास मागे हटणार नाही, अशी धमकीही दिली. घाबरलेली आई सुनीता मराठे धाडस दाखवत देवरूख पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
Ratnagiri Crime News: गुगल पे वापरून काही पैसे दिल्याचा मागील व्यवहार...
श्रीकांतने गुगल पे वापरून काही पैसे दिल्याचा मागील व्यवहार पोलिसांना मिळाल्याने त्याचा माग काढला गेला. त्यातूनच त्याचा चिपळूणकडे जात असल्याचा अंदाज आला आणि देवरूख पोलिसांनी चिपळूण पोलिसांना माहिती देऊन त्याला ताब्यात घेतले. सध्या श्रीकांतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याच्या वडिलांवर केलेल्या अपहरण आणि धमक्या यांचा तपास करीत आहेत. अपहरण आणि खंडणी मागणीची ही घटना स्थानिक समाजात धक्कादायक ठरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातून परिवारातील आर्थिक आणि मानसिक ताण स्पष्ट झाला असून, वेळेत पोलिसांच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
श्रीकांत मराठे पुण्यात राहतो, तर त्याचे वडील दत्तात्रय मराठे (८०) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतल्याने पुढील तपास सुरू आहे.























