एक्स्प्लोर

Ramdas Kadam PC: ... तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासा, रामदास कदमांचा बोचरा वार, "100 वेळा आलात तरी योगेशला हरवू शकणार नाही"

Ramdas Kadam PC : "मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल," असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं.

Ramdas Kadam PC : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील (Khed) सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामदास कदम, योगेश कदम, शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आलात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे." "मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल," असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे.   

...तर माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल

केशवराव भोसलेचा ड्रायव्हर या वक्तव्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल. मी वाघासारखा जगलोय, कोणाचा ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. केशवराव भोसले यांच्या निवडणुकीच्या वेळी माझी गाडी,माझा पैसा, माझं डिझेल, काय संबंध कोणाचा ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा? काल तुम्ही भाषणाची सुरुवातच अशी केली.

योगेशला, मला संपवण्याचे प्रचंड प्रयत्न

रामदास कदम म्हणाले की, माझा मुलगा योगेश कदमला तुम्ही संपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. योगेश कदम यांना संपवण्यासाठी काय कारस्थान झालं ते 19 तारखेला उदय सामंत सांगणार आहेत. मला तर तुम्ही संपवणार होताच. मीडियासमोर जाण्याची मला बंदी घातली होती." "2009 च्या निवडणुकीत मला पाडा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा दावाही रामदास कदम यांनी केला.

मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही गद्दारी केली

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना तुमचे हात बरबटलेले आहेत. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. तुम्ही अशोक पाटील यांचे तिकीट कापण्यासाठी किती पैसे घेतले? मुख्यमंत्री होण्यासाठी तम्ही गद्दारी केली. तुम्ही गद्दार आहात. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi  On Marathi Sahitya Sammelan  : 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचंं खातेवाटप जाहीर, कुणाकडं कोणतं खातं? पाहा लिस्ट!Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्सेGautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Embed widget