Sindhudurg Election 2025: सिंधुदुर्गात नारायण राणे भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी आग्रही, पण नितेश राणे स्वबळावर अडून बसले; महायुतीत नेमकं काय घडतंय?
Sindhudurg Election 2025: आता काही झाले तरी आम्ही भाजप, शिंदे यांच्या शिवसेनेची युती करण्याचे जवळपास ठरविले आहे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे.

Sindhudurg Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत (Local Body Election) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामध्ये महायुतीत सारं काही आलबेल नाही, अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. युती व्हावी अशी भूमिका मंत्री नितेश राणे (Nitesh) सोडले तर सगळ्यांची आहे मग माशी शिंकली कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), खासदार नारायण राणे (Narayan Rane), मंत्री उदय सामंत (Uday Samant), आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar), आमदार निलेश राणे (Nilesh Rane) एवढ्या सगळ्या नेत्यांना युती व्हावी असंच वाटतं. मात्र मंत्री नितेश राणेंनी दिलेला स्वबळावर नारा सगळ्यांना भारी पडतोय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Narayan Rane: आम्ही भाजप, शिंदे यांच्या शिवसेनेची युती करण्याबाबत ठरवलंय
निवडणुकीबाबत खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे की, आता काही झाले तरी आम्ही भाजप, शिंदे यांच्या शिवसेनेची युती करण्याचे जवळपास ठरविले आहे. मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेतील. ही युती व्हावी असे मला वाटते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष बसावा, 80 टक्क्यांपेक्षा जास्त जागा युतीने घ्याव्यात आणि युती झाल्यानंतर त्या येतील, असा माझा विश्वास आहे. तर काही जण राणे कुटुंबाबाबत बातम्या पसरवत आहेत, मात्र जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत राणे कुटुंबाबत कोणताह वाद होणार नाही. आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
Uday Samant on Narayan Rane: सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणेंचा सल्ला घेणं क्रमप्राप्त : उदय सामंत
तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय की, नारायण राणेंची मी आणि दीपक केसरकर यांनी भेट घेतली. राणेंचं मत युतीने पुढे जावं असं आहे. नारायण राणे वरिष्ठांशी युतीबाबत बोलणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नारायण राणेंचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे. ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही खासदार, आमदार होण्यासाठी प्रयत्न करतो. महायुतीत लढतो. मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत वेगवेगळे लढून कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो, असा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात तयार होतात. मात्र युती झाली नाही तर आम्ही स्वतंत्र लढू, तशी तयारी सुरू आहे. पण, यासाठी आम्ही आततायीपणा करणार नाही, असे त्यांनी म्हटले सांगितले आहे.
Vaibhav Naik : नारायण राणेंना पक्षात किंमत राहिली नाही : वैभव नाईक
दरम्यान, महायुतीतील दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आलेत. लोकसभेला आणि विधानसभेला एकत्र आले नसते तर विजय मिळाला नसता, म्हणून एकत्र आले. मात्र येणाऱ्या निवडणुकीत त्यांची एक-एकटे निवडणूक लढण्याची ताकद नाही. म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील. नारायण राणेंना पक्षात किंमत राहिली नाही. खासदार असून त्यांना न विचारता अनेकांना पक्षात घेतलं जातं, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी लगावलाय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
Nitesh Rane: काय म्हणाले होते नितेश राणे?
नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपची ताकद असल्यामुळे स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत असा आग्रह धरला. तसेच भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तशाच भावना असून आपण आपला झेंडा फडकला पाहिजे, असे म्हटले होते. संपूर्ण कोकणात अशी एकतरी विधानसभेची जागा दाखवा जी भाजपच्या ताकदीशिवाय आमदार झाला आहे. येथे भाजप शिवाय कोणीही आमदार होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा






















