एक्स्प्लोर

Parshuram Ghat: मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत बंद राहणार, पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय

Mumbai-Goa Highway : परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे. 

रत्नागिरी : कोकणातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्याच्या आधी परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

या काळात परशुराम घाट बंद असला तरी या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागमोडी वळणाचा चिपळूण नजीकचा परशुराम घाट हा महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटरचा घाट आहे. गेल्या वर्षी पावसामुळे याच घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरश: डोकेदुखी बनली होती. याचं एकमेव कारण म्हणजे संथ गतीने सुरु असलेले घाटातील चौपदरीकरणाचे काम. कामावेळी अर्धवट केलेल्या डोंगर कटाईमुळे पावसाळ्यात या डोंगराची माती, दरड महामार्गावर येवून वाहतूक ठप्प व्हायची. गेल्या पावसात तर आठ वेळा दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. तर घाट दोन महिने बंद करण्यात आला होता.

पाऊस थांबल्यानंतर या घाटाच्या कामासंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले आहे. घाटातील रुंदीकरणाच्या कामालाही गती देत दिवस-रात्र काम सुरु ठेवण्यात आले आहे. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेला दरडीच्या डेंजर झोनमध्ये संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम मार्गी लावण्याची शक्यता आहे.
 
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाटा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मीटर उंचीचा डोंगर उतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढेगाव. त्यामुळे येथे डोंगर खुदाईसह अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर खुदाई करतात पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता.

या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायतालगत असलेल्या गावात सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 450 मीटर लांबीची आणि दुसऱ्या सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला. मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जाणाऱ्या दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu : बावनकुळे चर्चेआधी अभिप्राय देत असतील तर चुकीचं, बच्चू कडू आक्रमक
Farmers Protest: 'सरकारनं डाव टाकला', Manoj Jarange यांचा गंभीर आरोप, Kadu यांच्या आंदोलनात सहभाग
Bachchu Kadu : मुंबईत आलो म्हणजे कमीपणी घेतला असं होत नाही - बच्चू कडू
Bachchu Kadu : 'कर्जमुक्तीची घोषणा तारखेसह करा, नाहीतर...', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Thackeray Brothers Unite: निवडणूक आयोगाविरोधात Uddhav आणि Raj Thackeray एकत्र, YB Chavan Centre मध्ये बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!
मोठी बातमी :  मुंबईत तब्बल 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; रोहित आर्यचं कृत्य, व्हिडीओ बनवून मोठ्या मागण्या
मोठी बातमी : मुंबईत तब्बल 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; रोहित आर्यचं कृत्य, व्हिडीओ बनवून मोठ्या मागण्या
Gautami Patil Abhijeet Sawant: गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट; थेट 'इंडियन आयडॉल'सोबत झळकणार?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?
Silicon Valley Sex Warfare: चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
चीन आणि रशियानं आता सेक्स वॉर पुकारलं! ते तरुण टार्गेट, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Embed widget