Maharashtra Politics Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचं ठरलं! चिपळूण की गुहागर? विधानसभा निवडणूक कुठून लढवणार?
Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड आमदार भास्कर जाधव हे चिपळूणमधून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics Bhaskar Jadhav : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सगळ्याच पक्षांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. अनेकजण आपले मतदारसंघ निवडण्यासाठी चाचपणी करत आहेत. सध्या ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे पुन्हा एकदा चिपळूणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. चिपळूणमधून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी चिपळूण मतदार संघामध्ये भास्करराव जाधवांच्या होत आहेत.
या आधी भास्कर जाधव 1995 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे भास्कर जाधव शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते 2004 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे राहिले. मात्र, त्यांना तिथे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जाधव यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2005 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलानंतर ते विधान परिषदेचे सदस्य झाले. 2009 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांचा पराभव गुहागर मतदारसंघातून केला. 2009 व 2014 या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना आघाडी सरकारच्या काळात मंत्री केलं तसेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांना संधी देण्यात आली. आघाडीच्या काळात नगर विकास, क्रीडा, वन अशी विविध नऊ खाती त्यांनी सांभाळली. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांची धुरा ही त्यांच्या खांद्यावरती होती.ज्या ज्या पदावर ती त्यांनी काम केलं ते ते यशस्वी झाले असं त्यांच्याबद्दल बोललं जातं.
शिवसेनेची आक्रमकता त्यांच्या राजकीय जीवनाचा भाग राहिला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी दाखवत पुन्हा एकदा शिवसेनेचे बंधन हाती बांधलं. 2004 नंतर 15 वर्षांनी भास्कर जाधव आणि मातोश्री वरती जाऊन पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधले.
चिपळूण मतदारसंघ फायदेशीर?
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघांमध्ये शिवसेनेला जसा पाहिजे तसा उमेदवार राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार शेखर निकम यांना टक्कर देणारा नसल्यामुळे चिपळूण मधून सध्या भास्कर जाधव हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवावर्ग भास्करराव जाधव यांनी जास्तीत जास्त जवळ केलेला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडल्यामुळे चिपळूणचे सध्याचे विद्यमान आमदार शेखर निकम हे अजित पवार यांच्या गटामध्ये सामील झाले आहेत. तर, चिपळूण मधले माजी आमदार रमेश कदम हे शरद पवार यांच्याकडे वळलेले पाहायला मिळाले. याचाच फायदा घेत सध्या महाविकास आघाडीतून चिपळूण मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर भास्कर जाधव हे विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक असल्याची चर्चा आहे.