Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने NGO तील मुलांना वाटले पाचशे रुपये; नेमकं प्रकरण काय?
Rakhi Sawant Mother : राखी सावंतच्या आईची प्रकृती खालावली असून प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी 'ड्रामा क्वीन' वेगवेगळे प्रयत्न करत आहे.
Rakhi Sawant Help NGO Kids : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. राखीने 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) चौथं पर्व गाजवलं असून शेवटच्या टप्प्यात तिने खेळ सोडला. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच राखीच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न करत आहे.
आईच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी राखी रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करत आहे. दरम्यान तिने मुंबईतील एका एनजीओला (NGO) भेट दिली आहे. एनजीओतील मुलांना पैशांची वाटप करतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती त्या लहान मुलांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगत आहे.
राखीचा व्हिडीओ व्हायरल (Rakhi Sawant Video Viral)
राखी म्हणाली,"औषधे आणि प्रार्थनाच माणसाला वाचवतात. मी हेच शिकले आहे". एनजीओतील मुलांना राखीने प्रत्येकी पाचशे रुपये आणि वेफर्सचं पाकीट दिलं आहे. राखीला भेटल्याने एनजीओतील मुलं खूपच आनंदी झाले आहेत. त्यांना भेटल्यानंतर राखीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
राखीने नुकतीच आईची भेट घेतली असून तिच्या आईची तब्येत सध्या खूपच नाजूक आहे. आईला भेटल्यानंतर राखी रुग्णालयाबाहेर येत मीडियासोबत संवाद साधत म्हणाली,"मला माझ्या आयुष्यात खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. असं आयुष्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. सध्या लोक मला ट्रोल करत आहेत, त्यांना हे नाटक वाटतयं. पण याकडे मी दुर्लक्ष करत आहे".
राखीच्या आईला कोणता आजार झाला आहे?
राखी सावंतच्या आईला 'ब्रेन ट्युमर' (Brain tumor) झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. मात्र, यावेळी त्यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. मुकेश अंबानी यांनी देखील राखीला उपचारासाठी मदत केल्याचं म्हटलं जात आहे. राखी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगत आहे.
संबंधित बातम्या