एक्स्प्लोर

Kumudini Chavan : वंचितकडून रायगडमध्ये मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना तिकीट! गीते यांना फटका बसणार?

वंचित बहुजन आघाडीने म्हणजेच वंचितने रायगड या जागेसाठी कुमुदिनी चव्हाण यांना तिकीट दिले आहे. आता महायुती, महाविकास आघाडी यांच्या लढतीत कुमुदिनी चव्हाण यांनीदेखील उडी घेतली आहे.

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत 'एकला चलो'रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. नुकतेच या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर (VBA Fifth List Of Candidates) केली आहे. या यादीत रायगड (Raigad) मतदारसंघासह एकूण 10 उमेदवारांची नावे आहेत. रायगड लोकसभेसाठी कुमुदिनी चव्हण (Kumudini Chavan) यांच्या नावाची घोषणा केली आहे. 

कुमुदिनी चव्हाण मराठा समाजातून येतात

कुमुदिनी चव्हाण या मराठा समाजातून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या जिल्ह्याची राजकीय गणितं बदलणार आहेत. सध्या ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असून या मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे आहेत. यंदाच्या निवडणुकीतही अजित पवार यांनी तटकरे यांनाच तिकीट दिले आहे. म्हणजेच तटकरे आता रायगडमधील महायुतीचे उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट दिले आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. एकीकडे गीते आणि तटकरे यांच्यात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना आता वंचितनेही इथे उमेदवार दिला आहे. 

कुमुदिनी चव्हाण कोण आहेत?

कुमुदिनी चव्हाण या रायगड येथील उद्योजक रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी आहेत. रवींद्र चव्हाण हे युवा अस्मिता फाऊंडेशनचे डायरेक्टर तसेच कोकण विकास प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कुमुदिनी चव्हान या मराठा आहेत. त्या मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष असून  कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्याबरोबरच महाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका देखील आहेत. इतर उमेदवारांच्या तुलनेत त्या उच्च शिक्षित आहेत. 

गीते यांना फटका बसणार?

वंचितने येथे एक महिला चेहरा दिला आहे. कुमुदिनी या मराठा समाजातून येतात. त्यामळे मराठा समाजाची मतं त्यांना मिळणार का? असे विचारले जात आहे. कुमुदिनी यांच्यामुळे गीते यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण कुमुदिनी यांच्यामुळे  मोठी मतफुटी होण्याची शक्यता आहे. कुमुदिनी यांना दलित, ओबीसींची मते मिळू शकतात. परिणामी त्याचा फटका गीते यांना बसू शकतो. येथे मविआ आणि महायुती यांच्यात लढत होणार असली तरी या दोघांच्या लढाईत वंचीतदेखील आपली ताकद  आजमावणार आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पाचव्या यादीत दहा उमेदवारांची नावे  

दरम्यान, वंचित बहुजन आघाडने 11 एप्रिल रोजी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादित एकूण 10 उमेदवारांची नावे आहेत. रायगड, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी वंचितने आपल्या पाचव्या यादीत उमेदवारांची घोषणा केली आहे.  

हेही वाचा >

 रायगडावर सुनील तटकरे नाराजीची 'तटबंदी' भेदून किल्ला राखणार की अनंत गीते मशाल पेटवणार?

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल, उपचार चालू

वंचितची पाचवी यादी जाहीर, मुंबईतून उत्तर भारतीय उमेदवार, धाराशीवमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAbu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासाRaj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखतPM Modi Calls Team India : पंतप्रधान मोदींकडून फोनवर संवाद साधत टीम इंडियाचं कौतुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
IND vs SA T20 World Cup: वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...
भारताने विश्वचषक जिंकताच पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसला फोन फिरवला, रोहित-विराटला म्हणाले...
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Embed widget