एक्स्प्लोर

रायगडमधील महायुतीच्या नाराजीनाट्यावर पडदा, तटकरेंच्या 'त्या' एका आश्वासनाने तिढा सुटला

Lok Sabha Election 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पाहायला मिळत होता.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) देखील असाच काही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते आणि रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना (Sunil Tatkare) विरोध केला जात होता. सोबतच भाजपचे देखील काही पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे तटकरेंच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत होते. मात्र, आता हा वाद मिटला असून, तटकरे यांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदेसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharatshet Gogawale) म्हणाले आहेत. 

रायगड लोकसभेतील महायुतीचे उमेदवारी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर भाजपसह इतर कार्यकर्ते रायगडमधून नाराज होते. मात्र, ही नाराजगी आता संपली असल्याची पाहायला मिळत आहे. कारण एका कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी याबाबत भाष्य करत, 'आम्ही सुनील तटकरे यांना युतीचा धर्म पाळून मदत करणारं आहोत. आम्हाला ते विधानसभेला मदत करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं गोगावले म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

मागील काही दिवसांपासून जी काही चर्चा सुरु होती, त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि आमची बैठक झाली आहे. त्यामुळे आता व्यवस्थितपणे मनोमीलन झाले आहे. मी देखील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार आजची आमची एकत्रित बैठक पार पडली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना मोठ्या फरकाने आणि टॉप टेनमध्ये निवडणून आणणार आहोत. तसेच आम्ही जेवढ्या ताकदीने लोकसभा निवडणूकीत काम करणार आहोत, त्यापेक्षा दुपटीने विधानसभा निवडणुकीत ते आमचे काम करतील असे तटकरे यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे गोगावले म्हणाले. 

भाजप नेत्यांची ही समजूत निघाली...

शिंदेसेना प्रमाणेच भाजपमधील स्थानिक कार्यकर्ते देखील तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध करत होते. तटकरे यांना उमेदवारी देऊ नका असा सुरु भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे शिंदेसेना आणि भाजपमधील स्थानिक नेत्यांची, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एक एकत्रित बैठक आयोजित केली होती. यावेळी स्थानिक महत्वाच्या नेत्यांना देखील बोलवण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत मागील सर्वकाही विसरून महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता तटकरे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Sunil Tatkare : 'सुनील तटकरेंचा राजकीय कडेलोट करणार'; शिंदेसेनेचे नेते आक्रमक, आता रायगडात नाराजीनाट्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहाAditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget