Raigad Irsalwadi Landslide Live Updates :इर्शाळवाडीत प्रशासनाच्या मदतीला गावातील लोक आणि त्यांचे नातेवाईक...
Irsalwadi Landslide Live Updates : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Background
Raigad Irsalwadi Landslide Live Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
गावात 50 ते 60 घरांची वस्ती
या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इरसालगड इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Kavnai Landslide : इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही
Kawanai Fort : इगतपुरी तालुक्यातील प्राचीन गाव असणाऱ्या कावनई येथील किल्ल्यावरून दगडी दरड खाली कोसळली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली गावकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असा 14 शतकातील कावनई किल्ल्याचा काही भाग थोड्या वेळापूर्वी कोसळला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
इर्शाळवाडीत प्रशासनाच्या मदतीला गावातली लोक आणि त्यांचे नातेवाईक
Irshalwadi Landslide : प्रशासनाबरोबर गावातली लोक आणि त्यांचे नातेवाईक रेस्क्यूला आले आहेत. आपले नातेवाईक भेटतील एक आशेने आले आहेत.आजूबाजूच्या गावातले लोकही आहेत. सध्या इर्शाळवाडीत पाऊस सुरु आहे.
























