आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
आमदार महेंद्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जहरी टीका होती. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतही वक्तव्य केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रकमक झालीय.

रायगड : आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) यांनी अलिबाग येथील एका कार्यक्रमात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जहरी टीका होती. आजचा औरंगजेब हा सुतार वाडीत राहतो असं म्हणत तटकरेंवर सडकून टीका केली होती. मात्र, यावेळी आमदार थोरवे यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू तरुण पिढीला स्फूर्ती देणारा असल्याचं वक्तव्य केलं होतं, याचं वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्या ॲड. सायली दळवी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी केली आहे. महेंद्र थोरवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा शिवप्रेमी तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा दळवी यांनी यावेळी आमदार थोरवे यांना दिला आहे.
काय म्हणाले होते महेंद्र थोरवे?
राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, असे महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे. 'छावा' चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली. 'आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय', अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अनिकेत तटकरेंची महेंद्र थोरवेंवर टीका
महेंद्र थोरवे हे स्वतःच अपयश लपवण्यासाठी आता दुसऱ्यांवर बोट दाखवत आहेत असे म्हणत अनिकेत तटकरे यांनी भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणूकीत आम्ही महाड आणि अलिबाग मतदारसंघात गोगावले आणि दळवी यांच्यासाठी काय काय केले. हे माझ्याकडे मुठीत झाकलेले आहे असेही ते म्हणाले. आम्ही त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आहे असे ते म्हणाले. शिंदे सेनेचे तीनही आमदार आता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्या राष्ट्रवादीवर आणि तटकरे परिवारवर टीका करत आहेत असे अनिकेत तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांनी आम्हाला तिघांना पाडण्यासाठी विधानसभा निवडणूकीत प्रयत्न केले. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येऊन स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं अस भरत गोगावले यांनी विधान केलं होत. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, आमची सुध्दा तुमच्या म्हणण्यानुसार कोणत्याही मंदिरात येण्याची तयारी आहे. त्यांचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊदे असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























