Raigad Crime News: इन्स्टाग्रामवर खोटं खातं; पतीलाच भेटायला बोलवलं, प्रियकर-मैत्रिणीच्या मदतीनं अपहरण अन् जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून संपवलं, नागोठणेतील घटना
Raigad Crime News: १० ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि वासगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला.

रायगड: रायगड मधील नागोठणे पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाच्या खुनाचा (Raigad Crime News) गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत तरुण कृष्णा नामदेव खंडवी (रा. गौळवाडी, पेण) याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसोबत कट रचून खून (Raigad Crime News) केल्याचे समोर आले आहे. १९ वर्षीय आरोपी दिपाली अशोक निरगुडे, तिचा २१ वर्षीय प्रियकर उमेश सदु महाकाळ आणि त्यांची १९ वर्षीय मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी संगनमत करून कृष्णा खंडवीला “प्रेमाच्या जाळ्यात” अडकवले. इन्स्टाग्रामवर बनावट “पायल वारगुडे” नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधण्यात (Raigad Crime News)आला. १० ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि वासगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याचा खून (Raigad Crime News)केला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला.(Raigad Crime News)
Raigad Crime News: सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास
सुरुवातीला प्रकरण मिसिंग व्यक्तीचे असल्याने कोणताही पुरावा नव्हता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना गाठले. पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कुलकर्णी (सहायक पोलीस निरीक्षक) यांच्या पथकाने ही कारवाई केली. रायगड पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा बनावट आयडीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या तपासात दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागोठणे पोलिस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Raigad Crime News: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची निर्दयपणे हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, तिघांनी संगनमत करून कृष्णा खंडवीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची निर्दयपणे हत्या केली. त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘पायल वारगुडे’ या नावाने बनावट खाते तयार केले आणि त्या खात्यामार्फत कृष्णाशी संपर्क साधला. १० ऑक्टोबर रोजी या खोट्या ‘पायल’च्या नावाने कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावण्यात आले.कृष्णा ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर आरोपींनी त्याच्याशी गोड बोलत त्याला वासगावच्या जंगलात नेले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी आधी आखलेल्या योजनेप्रमाणे ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून कृष्णाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकण्यात आले. एवढंच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याचा मोबाईल फोनही फोडून टाकला.
या प्रकरणानंतर पोलिसांसमोर कृष्णा खंडवीची हत्या कोणी केली, हा मोठा प्रश्न उभा राहिला. सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र, त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे संशयितांचा माग काढला. अखेर सखोल तपासानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.


















