Weather Update : काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला! पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Update : राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. तर घाटमाथ्यावर अद्याप पाऊस सुरू आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
![Weather Update : काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला! पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज weather update 30 July rain alert in Maharashtra today Rain warning at in Pune mumbai konkan and some other district read imd alert Weather Update : काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला! पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/30/56bc696bd5835cb6567cf169ec005b961722323446624442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weather Update : राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. तर घाटमाथ्यावर अद्याप पाऊस (Rain Update) सुरू आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लावली असून, पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यात (Pune Rain) पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (मंगळवारी) राज्यातील बहुतांशी भागांत पावसाची उघडीप असेल. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यासह (Pune Rain) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे, तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उद्यापासून (बुधवार) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुधवार (दि. 31), गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरात (Pune Rain) पावसाची संततधार सुरू आहे. हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, सोमवारी दिवसभरात 4.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (Pune Rain) इशारा दिला आहे.
कोकणातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आजही यलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पावसाचा (Pune Rain) अंदाज आहे. पुण्याला (Pune Rain) आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर घाट माथ्यावरील परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर भागात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे, कोकण, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ यासाह काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवड्यात आज तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे शहरात पाच वर्षांतील हा तिसरा मोठा पाऊस
शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये जुलै महिन्यातील सर्वांत मोठा पाऊस 2019 मध्ये 660 मी.मी. इतका पाऊस (Pune Rain) झाला होता. त्यानंतर यावर्षी 29 जुलैपर्यंत 380 मी. मी. पावसाची नोंद झालेली आहे. पाच वर्षांत झालेला हा तिसरा मोठा पाऊस आहे.पुण्यात वर्षभराचा सरासरी पाऊस 550 ते 620 मी.मी. इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)