एक्स्प्लोर
पुण्याचे महापौर आणि आयुक्तांमध्ये पाणीकपातीवरून दुमत
पुणे : पुणे महापालिकेतील पाणी कपातीचे संकट टळताना दिसत नाही आहे. पाणी कपातीवरून महापालिका आयुक्त आणि महापौरांमध्येच एकवाक्यता नसल्याने हे सकंट कधी टळणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी महापालिका परिक्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तेव्हा सोमवारपासून पुण्यात २४ तास पाणी देणार असं स्पष्ट केलं होतं. पण दुसरीकडे आयुक्त कुणालकुमार यांच्यामते एवढ्यातच २४ तास पाणी देणं शक्य नाही आहे.
त्यामुळे महापालिका क्षेत्रात पाणी कपातीचं काय होणार याबाबत अजूनही संभ्रम काय आहे. उन्हाळ्यात धरणांनी तळ गाठल्याने पुण्याला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता. त्यातच महापौरांनी दिलासा दायक माहिती दिली असताना, आयुक्तांनी मात्र शक्य नसल्याचे म्हटल्याने पाणी कपातीची तलवार पुणेकरांवर कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
पुणेकरांना खुशखबर, सोमवारपासून पाणीकपात रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement