एक्स्प्लोर
VIDEO : पुण्यात व्यापाऱ्याच्या बंगल्याबाहेर पोर्श आणि अल्टो पेटवली
खडकी भागात बंगल्यासमोर उभ्या असलेल्या पोर्श आणि अल्टो या दोन गाड्यांना आग लावून तीन अज्ञात व्यक्तींनी पळ काढला.
पुणे : पुण्यात गाड्यांच्या तोडफोड आणि जाळपोळीचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. अत्यंत आलिशान पोर्श गाडीला विकृतांनी आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकीत सोमवारी मध्यरात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
खडकी भागात बंगल्यासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्यांना आग लावून तीन अज्ञात व्यक्तींनी पळ काढला. या आगीत महागडी पोर्श आणि अल्टो अशा दोन गाड्या भस्मसात झाल्या. या प्रकरणी खडकी पोलिसात फिर्याद दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु आहे.
खडकीतील सोने-चांदीचे व्यापारी असलेल्या महिपाल पारेख यांच्या बंगल्यासमोर उभ्या असणाऱ्या गाड्यांना आग लावण्यात आली होती. आग लागल्याचं लक्षात येताच पारेख यांनी तातडीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील अग्निशमन दलाला फोन केला, परंतु त्यांची गाडी नादुरुस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.
पिंपरी-चिंचवड शहरातील अग्निशामक दलाची दुसरी गाडी येईपर्यंत पोर्शे आणि त्याशेजारी असणारी अल्टो या दोन गाड्या आगीत भस्मसात झाल्या होत्या.
पोलिसांनी पारेख यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तिघे जण बाटलीतून पेट्रोलसदृश्य पदार्थ ओतून आग लावताना दिसत आहेत.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
शिक्षण
बातम्या
Advertisement