एक्स्प्लोर

Vasant More Resignation : मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Vasant More Resignation : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.

पुणे मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा (Vasant More MNS) निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) राजीनामा दिला आहे. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला राम राम केल्याने राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांंपासून रंगली होती. त्यातच त्यांनी अनेक खदखददेखील व्यक्त केली होती. त्यांनी आज सकाळीच 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो', अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे

Vasant More Resignation : पत्रात नेमकं काय लिहिलंय?

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे 'तर अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती.

धन्यवाद ।

आपूज्य विश्वास

Vasant More Resignation; शरद पवारांना साथ देतील?

शरद पवारांनी पुण्यात मेळावा आयोजित केला होता. यावेळी वसंत मोरे अचानक या मेळाव्यात पोहोचले होते. त्यानंतर मनसेचे फायर ब्रॅंड नेते शरद पवारांचा हात धरतात का?, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांनी थेट मनसेचा राजीनामा दिल्याने ते नेमके कोणत्या वेगळ्या पक्षात जातात कि शरद पवारांना साथ देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 
 
इतर महत्वाच्या बातम्या-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावीWalmik Karad CID Inquiry : बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरूWalmik Karad News : आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या खास शुभेच्छा
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना खास संदेश
Embed widget