एक्स्प्लोर

Pune Varandha Ghat News: वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद 

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता पुणे  (Pune)  जिल्ह्यातील भोर आणि कोकण विभागातील महाडला जोडणारा वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे.

Pune Varandha Ghat News: प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता पुणे  (Pune)  जिल्ह्यातील भोर आणि कोकण विभागातील महाडला जोडणारा वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. 29 जून रोजी मंदिरावर मोकळा दगड पडल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा म्हणून हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 
 
दुचाकी, तीन चाकी व हलकी वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद करुन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या भागाकडे जाण्यासाठी हा सर्वात लहान मार्ग असल्याने, दोन्ही जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वाहने घाट भागाचा वापर करतात. मर्यादित लेन आणि अचानक येणार्‍या वळणांमुळे गर्दी होत असल्याने ही वाहने घाटात वारंवार अडकतात. पावसाळ्यात या घटना नियमित घडतात. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते. पावसाळ्यात नागरिकांची गैर सोय होऊ नये आणि नागरिकांंचं नुकसान होऊ नये, यासाठी सगळ्या स्तरावरुन दरवर्षी प्रयत्न केले जातात. वरंध घाटाबरोबरच पुण्याजवळील काही भीतीदायक किंवा आपत्तीजनक पर्यटन स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
पुणे जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP) आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीसह व्यक्ती आणि जनावरांच्या स्थलांतराचे निरीक्षण केले.यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget