एक्स्प्लोर
पुण्यात अज्ञाताने 42 वाहनांच्या सीट कव्हर ब्लेडने फाडल्या!
सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहाजवळील रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांची वाहने पार्क केलेली असतात.
पुणे : पुण्याच्या वारजे परिसरतील बापूजी बुवा चौकात उभ्या केलेल्या 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्याची घटना ताजी असतानाच, आता सहकारनगर परिसरात तब्बल 42 वाहनांच्या सीट कव्हर ब्लेडने फाडल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहाजवळील रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांची वाहने पार्क केलेली असतात.
आज सकाळी यातील 42 वाहनांचे सीट कव्हर ब्लेडने फाडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये दोन रिक्षांचाही समावेश आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिवाशांनी सहकारनगर पोलीस आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, या परिसरात सतत होणाऱ्या अशा घटनांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement