एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार?
पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती आहे. तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरुन पीएमपीएमएलच्या सीएमडीपदी बदली करण्यात आली आहे.
जुलै 2016 मध्ये अभिषेक कृष्णन यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आल्यानंतर पीएमपीएमएलचं अध्यक्षपद रिकामं होतं.
सप्टेंबर 2016 मध्ये धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभार न स्वीकारल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही तुकाराम मुंढेंना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याची विनंती केली. मात्र ते पदभार स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचं गिरीश बापट यांनी सांगितलं.
तुकाराम मुंढेंना पदभार स्वीकारण्याची विनंती केली. मात्र पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देऊन पीएमपीएमएलचा अतिरिक्त पदभार द्यावा, अशी मागणी तुकाराम मुंढेंनी केल्याचं गिरीश बापट म्हणाले.
पीएमपीएमएलकडे एकूण 2 हजार 55 बसेस आहेत. त्यापैकी 1500 बसेस सध्या रस्त्यावर धावतात.
तुकाराम मुंढेंची नवी मुंबईतील कारकीर्द
नवी मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मुंढेंची बदली टाळली होती.
25 ऑक्टोबर 2016 रोजी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर भाजपने ठरावाच्या विरोधात म्हणजेच मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं.
महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, असं आरोप तेव्हा त्यांच्यावर करण्यात आले होते.
तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.
यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2012 मध्ये जालन्यातही ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.
संबंधित बातम्या:
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली
रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे
आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर
सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण
‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव
…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement