एक्स्प्लोर

Dattatray Gade: नराधम दत्तात्रय गाडे शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला? पोलिसांकडून परिसर पिंजायला सुरुवात, ड्रोनद्वारे शोधमोहीम

Dattatray Gade: नराधम दत्तात्रय गाडे त्याच्या मुळगावी लपला असण्याची शक्यता असल्याने शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे.

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्टँडमध्ये 26 वर्षीय प्रवासी तरूणीवरती बलात्कार केलेल्या नराधम आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांची तेरा पथकं त्याच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला पोलिसांनी एक लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. तो त्याच्या मुळगावी लपला असण्याची शक्यता असल्याने शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे.

आरोपी ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा दत्ता गाडे रहिवासी आहे. याच गावात आरोपी दत्ता गाडे यांचं घर आहे. स्वारगेटमध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते अशी माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे.  पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून शोध सुरू आहे. आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखे दिसतात. घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आरोपी गाडे याचा फोन बंद आहे. गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर याठिकाणी 2 गुन्हे तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात असे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचे गाव शिरूर गाठलं होतं.

बलात्कार करुन गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी

आरोपी दत्तात्रय गाडे हा मंगळवारी पहाटे बलात्कार करुन शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी गेला. गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र दुपारी माध्यमांमधुन त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरु झाल्या तेव्हा तो गायब झालाय . शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी पोलीस उसाच्या शेतात ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेतायत.

शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आलं आहे. 48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या गुणाट गाव परिसरात आल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जातो आहे. आरोपी दत्तात्रय गाडीच्या गावाला छावणीचे स्वरूप आलं आहे. 

नराधम दत्ता गाडेची कुंडली समोर

नराधम आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा ( वय वर्षे 36, रा. शिरुर) शिरुर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवासी आहे. घरातील परिस्थिती बेताची आहे. गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे. त्याची वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेती काम करतात. तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे, पत्नी, लहान मुले देखील आहेत. असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे. तो कायम उनाडक्या करत फिरत असायचा. त्याला झटपट पैसे कमावायचा नाद लागला. त्या नादात त्याने चोरी, लुटमार करण्यास सुरुवात केली. महिलांना, वृध्दांना लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दत्ता गाडेबाबत माहिती देताना सांगितले की, दत्तात्रय गाडे याने 2019 मध्ये कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असे. या दरम्यान त्याने चोरी करायला सुरूवात केली होती. ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट द्यायचा त्यानंतर तो त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने लुटत होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Embed widget