Sushma Andhare: पुण्यातील 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; पक्षप्रमुखाच्या भाषणापूर्वीच सुषमा अंधारेंनी घेतली नावं
Sushma Andhare: पुण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) गटनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील तीन विधानसभेच्या जागांवर दावाही ठोकला आहे.
Sushma Andhare: राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठका, दौरे, पक्षप्रवेश, मेळावे या घडामोडींना वेग आला आहे. अशातच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाने पुण्यापासून आपल्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आज पुण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) गटनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी पुण्यातील तीन विधानसभेच्या जागांवर दावाही ठोकला आहे.
पुण्यातील कोणत्या तीन जागांवर केला दावा
"मला प्रामणिकपणे सांगू वाटतं की, आमच्या काही जागा आतातरी प्रेमापोटी जाऊ नयेत. यावेळेला तरी त्या जागा आम्हाला अन् आम्हालाच मिळायला हव्यात. आम्हाला पुण्यातील हडपसरची जागा, वडगाव शेरीची जागा, कोथरुडची जागा आम्हाला मिळायला हव्यात. आम्ही हक्काने आपल्याकडे विनंती करतोय. पुणेकरांच्या वतीने ही मागणी ठेवणे गरजेचे आहे," असे म्हणत सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तीन जागांवर दावा केला आहे. आता यावरती महाविकास आघाडीतील इतर पक्षांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल
"भाजपला भासायला लागली आहे मतांची कडकी, म्हणून सत्ताधाऱ्यांना आठवलीय बहीण लाडकी. मुख्यमंत्र्यांच्या काही बहीणी अतिशय लाडक्या आहेत. पुजा खेडकर त्यांची लाडकी बहीण आहे. कारण तिला दिव्यांग प्रमाणपत्र शिंदे सरकारच्या काळात मिळाले. लाडके मेहूणे, दाजी उपाशी असताना बहिणींना मात्र 1500 रुपये देण्याची घोषणा केली," अशा शब्दात सुषमा अंधारेंनी (Sushma andhare) राज्य सरकारवरती हल्लाबोल केला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस तुम्ही कॉपी करून पास झाला आहात का? आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होते हे तुम्ही म्हणाल? सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कोणतीही मर्यादा नव्हती. महाराष्ट्रातील जनता डोक्याला गोडे तेल लावत नाही. धोतरावर शर्ट इन करत नाही. 70 वर्षात मोदी कुठेतरी चहा विकत होते. फडणवीस खोटे नरेटीव्ह देत आहेत. इथे सगळे भाचे उपाशी फिरत आहेत. दाजीना नोकऱ्या नाहीत आणि तुम्ही बहिणीला दीड हजार रुपये देत आहात? पहिले तुम्ही जुगड अड्डे, दारूचे अड्डे बंद करा. मग बहिणींची काळजी आहे असं सांगा असा हल्लोबोल देखील अंधारेंनी (Sushma andhare) यावेळी केला आहे.