एक्स्प्लोर

दीपक मानकर यांना अटक निश्चित, सुप्रीम कोर्टानेही जामीन नाकारला

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आहे.

नवी दिल्ली: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. तसंच दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात हायकोर्टानेही मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मानकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दीपक मानकर यांच्याकडे काम करत होते. त्यांनी 2 जून रोजी आत्महत्या केली होती. जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. या पाच जणांत दीपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते. दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे. दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं. संबंधित बातम्या :  दीपक मानकरांना हायकोर्टाचा पुन्हा झटका  दीपक मानकरांच्या याचिकेवर सुनावणीस दुसऱ्या खंडपीठाचाही नकार  दीपक मानकर 'आऊट ऑफ कव्हरेज'!  पुण्यातील नगरसेवक दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget