एक्स्प्लोर
पिंपरीत घरगुती वादातून चिमुकलीचा बळी
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आज पुन्हा एकदा घरगुती वादातून चिमुकल्याला जीव गमवावा लागला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आईने पोटच्या दोन वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केली आणि स्वतः विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ती बचावली मात्र निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागला.
चिखलीच्या कोयनानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. निशिगंध माळवदकर असे चिमुकल्याचे नाव असून स्वाती माळवदकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी स्वातीने मुलाच्या खिशात सुसाईड नोट देखील लिहून ठेवली. माझ्यामुळे आपलं घर तुटलं, याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. तुमचे आई-वडील तुम्हाला सोडून जाण्याला मी कारणीभूत असल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या माघे निशिगंधचे हाल होतील म्हणून मी त्याला ही सोबत घेऊन जात आहे. माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये. असं स्वाती यांनी चिट्ठीत नमूद केलं.
याप्रकरणी निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशीच घटना 23 जुलैला कासारवाडी परिसरात घडली होती. पतीला आनंदात ठेवू शकत नसल्याने पत्नीने सहा वर्षाच्या पोटच्या मुलीचा गळा घोटून हत्या केली आणि स्वतः देखील आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड शहरात घरगुती वादातून अशा पद्धतीनं दोन चिमुकल्यांना जीव गमवावा लागल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement