एक्स्प्लोर

Shrirang Barne : अजित पवारांसमोर श्रीरंग बारणे म्हणाले, पार्थविरुद्ध मी निवडून येणार हे सांगितलं होतं!

गेल्या लोकसभेत मी निवडून येणार हे ठामपणे सांगितलं होतं अन् मी खासदार झालो, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांसमोरच पार्थ पवारांच्या पराभवावर भाष्य केले. 

मावळ (जि. पुणे) : मावळमध्ये महायुतीच्या मेळाव्यामध्ये बोलताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गेल्या 2019 मधील निवडणुकीचा दाखला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर दिला. गेल्या लोकसभेत मी निवडून येणार हे ठामपणे सांगितलं होतं अन् मी खासदार झालो, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांसमोरच पार्थ पवारांच्या पराभवावर भाष्य केले. 

श्रीरंग बारणे यावेळी बोलताना म्हणाले की, अजित पवारांनी मला पहिलं तिकीट दिलं होतं. महापालिकेत त्यांच्यामुळे मी नगरसेवक म्हणून गेलो. कालांतराने मी वेगळ्या युतीत गेलो. आम्ही संपर्कात होतोच, आत्ता ही लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा अजितदादांचा फोन सर्वात आधी आला. 

आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशातील आजवर झालेल्या पंतप्रधानाच्या काळात घटना दुरुस्ती किती वेळा झाली. मात्र, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहे त्याला काही अर्थ नाही.

संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवरूनही अजित पवार यांनी भाष्य केले. विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका.

140 कोटींमध्ये 70 कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात 1 लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलत आहेत. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे, विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असल्याचे अजित पवार म्हणाले. 

महायुतीच्या बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार 

दुसरीकडे, मावळ लोकसभेची उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थित सुरू असलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीवर रामदास आठवलेंच्या आरपीआय गटाने बहिष्कार टाकला. मंचावर स्थान न दिल्यानं बैठकीतून आरपीआय गट बाहेर पडला. सभागृहाबाहेर घोषणाबाजी सुरू झाली, तेव्हाच उदय सामंत त्यांचं भाषण संपवून पुढच्या दौऱ्याला निघाले होते. 

आरपीआय गटाने सामंतांना घेराव घातला, आमचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांना डावलण्यात आलं असेल तर आम्ही का थांबावं. असा सवाल सामंतांना विचारला असता, नजर चुकीनं घडलं असेल, अशी कबुली सामंतांनी दिली. सामंतांनी आरपीआय गटाची समजूत काढून उमेदवार श्रीरंग बारणेंशी चर्चा घडवून आणली, त्यानंतर कांबळे यांना मंचावर स्थान दिलं.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Embed widget